जळगाव जिल्ह्यात १५ बाधितांचा मृत्यू
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 4, 2021 04:17 AM2021-04-04T04:17:05+5:302021-04-04T04:17:05+5:30
जळगाव : कोरोनातून बरे होणाऱ्यांची संख्या वाढत असतानाच दुसरीकडे मृत्यू मात्र थांबत नसल्याचे गंभीर चित्र आहे. यात शनिवारी पुन्हा ...
जळगाव : कोरोनातून बरे होणाऱ्यांची संख्या वाढत असतानाच दुसरीकडे मृत्यू मात्र थांबत नसल्याचे गंभीर चित्र आहे. यात शनिवारी पुन्हा १५ बाधितांच्या मृत्यूची नोंद करण्यात आली आहे. यात जळगाव शहरातील चार बाधितांचा समावेश आहे. शनिवारी ११९४ नवे बाधित आढळून आले असून, उच्चांकी १२२४ रुग्ण बरे झाले आहेत. जळगाव शहरात २३२ रुग्ण आढळून आले आहेत, तर चोपड्यात १६० रुग्ण आढळले आहेत.
ती महिला ५५ वर्षांची
शुक्रवारी जळगाव शहरातील एका २२ वर्षीय बाधित महिलेचा मृत्यू झाल्याची नोंद करण्यात आली होती. मात्र, मृत्यू झालेल्या महिलेचे वय ५५ होते. शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालयातून गेलेल्या माहितीनुसार २२ वर्षीय नोंद करण्यात आली होती. मात्र, संबंधित महिलेचे वय ५५ वर्षे असल्याचे शनिवारी स्पष्ट झाले.