हृदयद्रावक! वीज पडून १५ वर्षीय नातवाचा मृत्यू, आजोबा गंभीर जखमी 

By विजय.सैतवाल | Updated: March 31, 2025 23:42 IST2025-03-31T23:26:30+5:302025-03-31T23:42:11+5:30

जळगाव तालुक्यात अवकाळी पावसाचा बळी 

15-year-old grandson dies after being struck by lightning, grandfather seriously injured in jalgaon | हृदयद्रावक! वीज पडून १५ वर्षीय नातवाचा मृत्यू, आजोबा गंभीर जखमी 

हृदयद्रावक! वीज पडून १५ वर्षीय नातवाचा मृत्यू, आजोबा गंभीर जखमी 

विजयकुमार सैतवाल 

लोकमत न्यूज नेटवर्क 

जळगाव : तालुक्यातील धानवड परिसरामध्ये विजांच्या कडकडाटासह अवकाळी पाऊस होऊन वीज कोसळून अंकुश विलास राठोड (१५, रा. धानवड,  ता. जळगाव) या मुलाचा जागीच मृत्यू झाला तर त्याचे आजोबा शिवाजी जगराम राठोड (६५) हे भाजले जाऊन गंभीर जखमी झाले आहे. त्यांच्यावर शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालयात उपचार सुरू आहे. 

अंकुश राठोड हा मुलगा आजोबा शिवाजी राठोड यांच्यासह नेहमीप्रमाणे शेतात पिकांची राखण करण्यासाठी गेला होता. सोमवारी रात्री साडेआठ वाजेच्या सुमारास अचानक विजांसह अवकाळी पाऊस सुरू झाला. त्यावेळी धानवड ते भवानी खोरा रस्त्यावर असलेल्या शेतात वीज कोसळून अंकुश राठोड या मुलाचा मृत्यू झाला तर आजोबा शिवाजी राठोड हे भाजले गेले. ही घटना आजूबाजूच्या नागरिकांच्या लक्षात येताच त्यांनी राठोड यांच्या कुटुंबियांना माहिती दिली. त्यावेळी पोलिस पाटील चंद्रकांत पाटील, अविनाश पाटील यांच्यासह गावकऱ्यांनी घटनास्थळी धाव घेत दोघांना शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालयात दाखल केले. मात्र तत्पूर्वीच अंकुशचा मृत्यू झाला होता तर गंभीर शिवाजी राठोड यांच्यावर उपचार सुरू आहे.

Web Title: 15-year-old grandson dies after being struck by lightning, grandfather seriously injured in jalgaon

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.

टॅग्स :Rainपाऊस