मनपाच्या कोविड सेंटरमध्ये १५०० बेड रिक्त

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 3, 2021 04:11 AM2021-05-03T04:11:58+5:302021-05-03T04:11:58+5:30

जळगाव : गेल्या दोन महिन्यांपासून कोरोनाच्या दुसऱ्या लाटेत संसर्ग झपाट्याने वाढत असून, ॲक्टिव्ह रुग्णांची संख्या जिल्हाभरात १० हजारांपर्यंत पोहोचली ...

1500 beds vacant in Corporation's Kovid Center | मनपाच्या कोविड सेंटरमध्ये १५०० बेड रिक्त

मनपाच्या कोविड सेंटरमध्ये १५०० बेड रिक्त

Next

जळगाव : गेल्या दोन महिन्यांपासून कोरोनाच्या दुसऱ्या लाटेत संसर्ग झपाट्याने वाढत असून, ॲक्टिव्ह रुग्णांची संख्या जिल्हाभरात १० हजारांपर्यंत पोहोचली आहे. जळगाव शहरातदेखील १ हजारपेक्षा अधिक रुग्ण सक्रिय असून, त्यापैकी ५०० हून अधिक रुग्ण गृहविलगीकरणात उपचार घेत आहेत, तर महापालिकेच्या अभियांत्रिकी महाविद्यालयातील कोविड केअर सेंटरमध्ये सद्य:स्थितीत केवळ २०० रुग्ण उपचार घेत आहेत. कोविड सेंटरमध्ये १७०० पैकी तब्बल १५०० बेड रिक्त आहेत.

————

ऑक्सिजनवरील रुग्णांची संख्या घटली

जळगाव : गेल्या काही दिवसांच्या तुलनेत शनिवारी ऑक्सिजनचा पुरवठा करावा लागणाऱ्या रुग्णांच्या संख्येत घट नोंदविण्यात आली. शिवाय लक्षणे असलेले रुग्णही घटत असून ही एक दिलासादायक बाब मानली जात आहे. दरम्यान, सलग नवे रुग्ण कमी व बरे होणारे रुग्ण अधिक अशी स्थिती कायम असल्याने जिल्ह्याला थोडा फार का होईना दिलासा मिळाला आहे. ऑक्सिजनवरील रुग्ण शुक्रवारपर्यंत १५३१ त्यात घट होऊन शनिवारी १३३४ रुग्ण उरले.

Web Title: 1500 beds vacant in Corporation's Kovid Center

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.