158 कोटीची विद्युतीकरणाची कामे
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 27, 2018 12:08 PM2018-04-27T12:08:38+5:302018-04-27T12:08:38+5:30
खासदार ए. टी. पाटील यांची माहिती
ठळक मुद्दे29 कोटीची विद्युतीकरणाची कामे22 हजार नागरिकांचा प्रश्न सुटणार
ज गाव : केंद्र सरकारच्या एकात्मिक ऊर्जा विकास व दीनदयाल उपाध्याय ग्राम ज्योती योजनेतून जिल्ह्यात 158 कोटी रुपयांची विद्युत यंत्रणेच्या बळकटीकरणाची कामे हाती घेण्यात आली आहेत, अशी माहिती खासदार ए.टी.पाटील यांनी दिली. शहरात 33/11 के.व्ही मेहरुण उपकेंद्रात आयोजित 10 एम.व्ही.ए. क्षमतेच्या रोहित्राच्या उद्घाटन समारंभात ते बोलत होते. यावेळी आमदार सुरेश भोळे, मुख्यअभियंता ब्रिजपालसिंह जनवीर, माजी महापौर सदाशिवराव ढेकळे, नगरसेवक अनिल देशमूख, राहुल वाघ, जीवन अत्तरदे, धिरज सोनवणे, प्रशांत नाईक, भुषण सोनवणे, इकबाल पिरजादे, कार्यकारी अभियंता संजय तडवी आदींची प्रमुख उपस्थिती होती. आमदार भोळे यावेळी म्हणाले की, शहरात 29 कोटीची विद्युतीकरणाची कामे सुरु आहेत. मेहरुण उपकेंद्रातील 2 कोटी निधी खर्च करुन झालेल्या रोहित्राच्या क्षमता वृध्दीमुळे तांबापुरा, सिंधी कॉलनी, एकनाथ नगर, शांतीनारायण, महाजन नगर, हनुमान नगर व मेहरुण या परिसरातील 22 हजार नागरिकांचा कमी वीज दाबाचा व वारंवार वीज पुरवठा खंडीत होण्याचा प्रश्न सुटणार आहे.