जळगाव जिल्ह्यात १६ प्रतिबंधक क्षेत्र जाहीर
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 5, 2020 12:07 PM2020-05-05T12:07:02+5:302020-05-05T12:07:55+5:30
जळगाव : जिल्ह्यात लवकरच जिल्ह्यातील कोरोना विषाणू संसर्ग तपासणी प्रयोगशाळा सुरु होणार असल्याचेही यावेळी जिल्हाधिकारी डॉ. अविनाश ढाकणे यांनी ...
जळगाव : जिल्ह्यात लवकरच जिल्ह्यातील कोरोना विषाणू संसर्ग तपासणी प्रयोगशाळा सुरु होणार असल्याचेही यावेळी जिल्हाधिकारी डॉ. अविनाश ढाकणे यांनी सोमवारी पत्रकार परिषदेत सांगितले. येथील कोविड रुग्णालयात सर्व रुग्णांची व्यवस्थित काळजी घेतली जात आहे. पीपीई किट, मास्क, सॅनिटायझरचा अजिबात तुटवडा नाही. त्याचबरोबर जिल्ह्यात औषधे व उपकरणांचा कमतरता नाही. जिल्ह्यात सुरक्षा तसेच दक्षतेच्या कारणास्तव एकूण १६ प्रतिबंधक क्षेत्र तयार करण्यात आले आहेत.
जिल्ह्याच्या सीमा १७ मे पर्यंत बंद राहणार
१७ मेपर्यंत जिल्ह्याच्या सीमा बंद राहणार आहे. मजूर, विद्यार्थी यांना जिल्ह्याबाहेर जाण्यासाठी त्यांची पुर्णपणे वैद्यकीय तपासणी करून त्यांच्यात कोरोनाचे कुठल्याही प्रकारचे लक्षणे नाही याची खात्री पटल्यावरच त्यांना त्यांच्या जिल्ह्यात जाण्यासाठी आॅनलाईन पध्दतीने पास निर्गमित करण्यात येत असल्याची माहिती जिल्हाधिकाऱ्यांनी दिली.
मुंबई-पुण्याहून येणाऱ्यांना सध्या प्रवेश नाही
प्रतिबंधक क्षेत्रातून नागरिकांना बाहेर जाता येणार नाही किंवा बाहेर येता येणार नाही अशी माहिती जिल्हाधिकाºयांनी दिली. जिल्ह्यात आपत्कालीन परिस्थिती उद्भवल्यास प्रत्येक तालुक्याच्या ठिकाणी कोविड केअर सेंटर, कोविड हेल्थ सेंटर स्थापन करण्यात आले आहे. त्याचबरोबर वैद्यकीय कारण वगळता मुंबई-पुण्यातून कोणालाही जिल्ह्यात येण्यासाठी तसेच जाण्यासाठी परवानगी नाही.