घराची साफसफाई करताना विजेच्या धक्क्याने १६ वर्षीय मुलाचा मृत्यू, गणेश कॉलनीतील घटना

By विजय.सैतवाल | Published: November 1, 2023 03:28 PM2023-11-01T15:28:34+5:302023-11-01T15:31:22+5:30

या घटनेमुळे चव्हाण कुटुंबीयांवर दु:खाचा डोंगर कोसळला असून शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालयात नातेवाईकांनी आक्रोश केला.  

16-year-old boy dies due to electric shock while cleaning house, incident in Ganesh Colony | घराची साफसफाई करताना विजेच्या धक्क्याने १६ वर्षीय मुलाचा मृत्यू, गणेश कॉलनीतील घटना

घराची साफसफाई करताना विजेच्या धक्क्याने १६ वर्षीय मुलाचा मृत्यू, गणेश कॉलनीतील घटना

जळगाव : घराची साफसाफाई करत असताना विजेच्या तारावर पाय पडल्याने सुनील संजय चव्हाण (१६, मूळ रा. मन्यारखेडा) याचादुदैवी मृत्यू झाला. ही घटना बुधवार, १ नोव्हेंबर रोजी सकाळी साडेनऊ वाजेच्या सुमारास गणेश कॉलनीत घडली आहे. या घटनेमुळे चव्हाण कुटुंबीयांवर दु:खाचा डोंगर कोसळला असून शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालयात नातेवाईकांनी आक्रोश केला.  

सुनाल चव्हाण हा जळगावातील बोहरा गल्लीतील बांधकामाच्या ठिकाणी आई-वडील व बहिण यांच्यासोबत वास्तव्याला आहे. बोहरा गल्लीतील फटाके दुकान मालकाने त्यांच्या गणेश कॉलनीतील घरी साफसफाई करण्यासाठी सुनील चव्हाण आणि त्याचा मित्र सागर सुभाष शिंदे यांना बुधवार, १ नोव्हेंबर रोजी सकाळी पाठविले होते. दोघेजण घराची साफसफाई करत असताना सुनीलच्या पायाचा वीज तारेला स्पर्श झाला. त्याला तातडीने शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालयात दाखल केले असता वैद्यकीय अधिकाऱ्यांनी मयत घोषित केले.
 

Web Title: 16-year-old boy dies due to electric shock while cleaning house, incident in Ganesh Colony

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.