वीजेच्या धक्याने १६ वर्षीय मुलाचा मृत्यू

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 24, 2019 02:56 PM2019-06-24T14:56:52+5:302019-06-24T14:57:19+5:30

जामनेर : देवपिंप्री येथील घटना

16-year-old son dies due to electricity | वीजेच्या धक्याने १६ वर्षीय मुलाचा मृत्यू

वीजेच्या धक्याने १६ वर्षीय मुलाचा मृत्यू

Next


जामनेर : तालुक्यातील देवपिंप्री येथे आपल्या मावशीच्या शेतात पेरणी करीत असताना वीजेच्या खांबाला असणाऱ्या ताण दिलेल्या ताराला हात लागून विशाल मोहन तवर या मुलाचा जागीच मृत्यू झाला. या घटनेने मोठी हळहळ व्यक्त होत आहे.
वीज खांबात अगोदरच विद्युत प्रवाह असल्याने त्याला शॉक लागून योगेश हा जागीच गतप्राण झाला. सारोडा जिल्हा खंडवा मध्य प्रदेश येथील रहिवासी विशाल मोहन तवर ( १६) हा आपल्या मावशीकडे देवपिंप्री येथे आला असता पेरणीसाठी शेतात गेला होता. पेरणी करीत असतांना वीजेचा खांबाला सपोर्टसाठी ताण देऊन असणाºया ताराला त्याचा धक्का लागला. अगोदरच वीज प्रवाह चालू असताना विशाल जागीच गतप्राण झाला. त्याच्या नातेवाईकांनी जामनेर येथे उपजिल्हा रुग्णालयात त्याला आणले असता त्याचे शवविच्छेदन करून मृतदेह नातेवाईकांच्या ताब्यात देण्यात आला. विशाल हा एकुलता एक मुलगा होता उपजिल्हारुग्णालयात त्याची बहीण व मावशी यांनी एकच हंबरडा फोडला त्याच्या पच्यात बहीण आई,वडील असा परिवार आहे. या घटनबाबत जामनेर पोलिसात आकस्मत मृत्यूची नोंद करण्यात आली आहे.या घटनेने हळहळ व्यक्त होत आहे.
मावशीकडे पाव्हाणा म्हणून आलेला विशाल हा वीजेचा शॉक लागून मरण पावल्याने मावशीने प्रचंड आक्रोश केला.त्यामुळे उपस्थितांची मने हेलावली.

Web Title: 16-year-old son dies due to electricity

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.