जिल्'ात एका दिवसात तब्बल १६३ रुग्ण
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 21, 2020 09:25 PM2020-06-21T21:25:43+5:302020-06-21T21:27:07+5:30
पाचव्यांदा शंभरी : आतपर्यंतचे एकाच दिवसातील सर्वाधिक रुग्ण
जळगाव : जिल्'ात रविवारी पुन्हा कोरोनाचा विस्फोट झाला व एकाच दिवसात तब्बल १६३ रुग्ण आढळून आले आहे़ ही आतपर्यंतची एका दिवसातील सर्वाधिक रुग्णसंख्या आहे. गेल्या १२ दिवसात पाचव्यांदा रुग्णसंख्येने शंभरी गाठली आहे़ यामुळे रुग्णसंख्या आता २४०२ वर पोहोचली आहे़
जिल्'ात रविवारी बोदवड वगळता सर्वच तालुक्यात रुग्ण आढळून आले यात सर्वाधिक जळगाव शहर ४०, चोपडा तालुक्यात २७ रुग्ण आढळले आहेत़ यानंतर भडगाव १८, भुसावळ व पारोळा प्रत्येकी १३ व रावेर १२ हे तालुके वगळता अन्य तालुक्यांमध्ये एकेरी रुग्णसंख्या आहे़
९० रुग्ण घेताहेत बाहेर उपचार
बाधितांपैकी ९० रुग्ण हे बाहेरच्या जिल्'ात उपचार घेत असून जिल्'ाची रुग्णसंख्या ही २४०२ असल्याचे प्रशासनाने कळविले आहे़ बरे झालेल्या रुग्णांची संख्या १४३७ आहे.
पाच जणांचा मृत्यू
रविवारी पुन्हा पाच जणांच्या मृत्यूची नोंद करण्यात आली आहे़ १६ जून तसेच २० जून रोजी झालेल्या मृत्यूची नोंद रविवारी करण्यात आली आहे़ मृतांची संख्या आता १६९ झाली आहे.
अशी होती शंभरी
९ जून - ११६
१० जून -११५
११ जून- १३०
१८ जून - १३५
२१ जून - १६३
महापालिका ४४४
मृत्यू २७
बरे झालेले २७३
जिल्हा १९५८
मृत्यू १४२
बरे झालेले ११६४