आरटीईतंर्गत १६५ विद्यार्थ्यांचे प्रवेश निश्चित
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 15, 2019 22:28 IST2019-04-15T22:18:41+5:302019-04-15T22:28:38+5:30
जळगाव - आर्थिक दुर्बल व मागास प्रवगार्तील विद्यार्थ्यांना शिक्षणहक्क कायद्यांतर्गत (आरटीई) २५ टक्के राखीव जागांवर प्रवेशासाठी पहिल्या फेरीत ...

आरटीईतंर्गत १६५ विद्यार्थ्यांचे प्रवेश निश्चित
जळगाव- आर्थिक दुर्बल व मागास प्रवगार्तील विद्यार्थ्यांना शिक्षणहक्क कायद्यांतर्गत (आरटीई) २५ टक्के राखीव जागांवर प्रवेशासाठी पहिल्या फेरीत २०१२ विद्यार्थी प्रवेशासाठी पात्र ठरले होते़ त्यापैकी १६५ विद्यार्थ्यांनी शाळांमध्ये आपले प्रवेश निश्चित केले आहे़
आर्थिक दुर्बल घटकांना मोफत शिक्षण मिळावे यासाठी शासनाकडून आरटीई २५ टक्के प्रवेश प्रक्रिया राबविण्यात येत असते़ यंदा ही प्रवेश प्रक्रिया जिल्ह्यातील २७४ शाळांमधील ३७१७ जागांसाठी राबविण्यात येत आहे़ त्यानुसार नुकतीच पहिली सोडत पुणे येथे काढण्यात आली़ यात जिल्ह्यातील २ हजार १२ विद्यार्थी प्रवेशसाठी पात्र ठरले़ त्यानंतर १० एप्रिल रोजी पालकांना प्रवेशासंदर्भात मोबाईलवर संदेश प्राप्त झाली़ पालकांनी लागलीच प्रवेशासंदर्भातील हालचाली सुरू करून शाळांजवळील केंद्रांवर जाऊन कागदपत्रांची पडताळणी करण्यास सुरूवात केली़ आतापर्यंत १६५ विद्यार्थ्यांच्या पालकांनी कागदपत्रांची पडताळणी पूर्ण करून आपल्या पाल्यांचे प्रवेश निश्चित केले आहे़ इतर विद्यार्थ्यांना २६ एप्रिलपर्यंत आपला प्रवेश निश्चित करता येणार आहे़ यंदा आरटीईच्या तीनच फेºया राबविण्यात येणार आहे़ याचा फायदा विद्यार्थ्यांना होणार असून नेहमीच अनेक जागा या रिक्त राहतात़ मात्र, यावेळेस तीनच फेºया राबविण्यात येणार असयामुळे सर्व जागांवर विद्यार्थ्यांचा प्रवेश निश्चित होण्याची शक्यता आहे.