१६७ नवे रुग्ण, २३० रुग्ण झाले बरे
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 30, 2021 04:21 AM2021-04-30T04:21:47+5:302021-04-30T04:21:47+5:30
लोकमत न्यूज नेटवर्क जळगाव : शहरात गुरुवारी १६७ कोरोनाबाधित आढळून आले असून २३० रुग्णांनी कोरोनावर मात केली आहे. ४ ...
लोकमत न्यूज नेटवर्क
जळगाव : शहरात गुरुवारी १६७ कोरोनाबाधित आढळून आले असून २३० रुग्णांनी कोरोनावर मात केली आहे. ४ बाधितांचा मृत्यू झाला आहे. बरे होणारे अधिक व नवीन रुग्ण कमी अशीच स्थिती गुरुवारी कायम असल्याने सक्रिय रुग्णांमध्ये घट झाली आहे. दुसरीकडे अन्य तालुक्यांमध्ये रुग्णवाढ समोर येत आहे.
शहरात गेल्या आठवडाभरापासून रुग्णसंख्या घटली आहे. ही संख्या २०० पेक्षा कमी नोंदविण्यात येत असल्याचे दिलासादायक चित्र आहे. चाचण्या वाढविण्यात आल्या असून जिल्ह्यात गुरुवारी ९३०८ अँटिजेन चाचण्या झाल्या, यात ७१७ बाधित आढळून आले आहेत तर २११५ आरटीपीसीआर तपासणींचे अहवाल समोर आले. यात ३४६ अहवाल समोर आले. तर २३५५ आरटीपीसीआर तपासण्या करण्यात आल्या. १६३० अहवाल प्रलंबित आहेत.
शहरातील ४८, ५३, ७०, ७० वर्षीय पुरुष रुग्णांचे मृत्यू झाले आहेत. यासह मुक्ताईनगर तालुक्यात ४, भुसावळ, रावेर प्रत्येकी ३, एरंडोल, जामनेर प्रत्येकी २, चाळीसगाव, बोदवड येथे प्रत्येकी एका बाधित रुग्णाचा मृत्यू झाला आहे.
उपचार सुरू असलेले रुग्ण १०७०५
लक्षणे असलेले रुग्ण ३०३३
लक्षणे नसलेले रुग्ण ७६७२
ऑक्सिजनवरील रुग्ण १५९२
अतिदक्षता विभागातील रुग्ण ८४५
केवळ ७ केंद्रांवर लस
जिल्ह्यात लसींचा साठाच नसल्याने गुरुवारी केवळ ७ केंद्रांवर २२४ जणांनी लसीचा पहिला डोस घेतला तर ४०६ नागरिकांनी लसीचा दुसरा डोस घेतला. लसीचे डोस उपलब्ध होत नसल्याने नागरिकांना केंद्रावरून परतावे लागत आहे.