वीस दिवसात १७ दुचाकी चोरी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 21, 2021 04:16 AM2021-04-21T04:16:28+5:302021-04-21T04:16:28+5:30

लोकमत न्यूज नेटवर्क जळगाव : शहरासह परिसरात दुचाकी चोरी होण्याचे प्रकार सुरूच आहे. दुचाकी चोरट्यांनी अक्षरश: धूमाकूळ घातला आहे. ...

17 bikes stolen in 20 days | वीस दिवसात १७ दुचाकी चोरी

वीस दिवसात १७ दुचाकी चोरी

Next

लोकमत न्यूज नेटवर्क

जळगाव : शहरासह परिसरात दुचाकी चोरी होण्याचे प्रकार सुरूच आहे. दुचाकी चोरट्यांनी अक्षरश: धूमाकूळ घातला आहे. गेल्या. गेल्या वीस दिवसात शहरातील विविध भागांतून १७ दुचाकी चोरीला गेली आहेत. याप्रकरणी शहरातील पोलीस ठाण्यांमध्‍ये गुन्हा दाखल आहे. नागरिकांची नजर चुकवून दुचाकी चोरणाऱ्या चोरट्यांच्या मुसक्या आवळण्‍यात अद्याप पोलिसांना यश आलेले नाही.

वीस दिवसांमध्‍ये शहरातील अजिंठा चौक, उस्मानिया पार्क, नवीन बसस्थानक, जिल्हा रूग्णालय आवार, भास्कर मार्केट, कुसुंबा, कालिंका माता मंदिर परिसर, टपाल कार्यालय परिसर, गेंदालाल मिल, रिंगरोड, सम्राट कॉलनी आदी भागांमधून दुचाकी चोरी गेल्याची माहिती समोर आली आहे. मागील वर्षी लॉकडाउनमध्‍ये चोरीचे प्रमाण कमी झाले होते. पण, दोन ते तीन महिन्यांपासून दिवसांपासून घरफोडी, दरोडे, लुटीच्या तसेच वाहन चोरीच्या घटना वाढल्या आहेत. कोरोनाच्या पार्श्वभूमीवर प्रशासनाने सध्‍या कडक निर्बंध घालून दिले आहे. विनाकारण रस्त्यावर ‍िफरण्यास सुध्दा मनाई केली आहे. चौका-चौकात पोलीस तैनात आहे. अशात देखील भरदिवसा शहरातून दुचाकी वाहने चोरून नेल्या जात आहेत. काही दिवसांपूर्वी दुचाकीस्वार तरूणाचा अपघात झाला. दुखापत झाली म्हणून रस्त्याच्या बाजूला दुचाकी उभी करून तरूण एका रसवंतीच्या बाकावर बसला. तितक्यात चोरट्याने तरूणाच्या समोरूनचं दुचाकी चोरून नेल्याची धक्कादायक घटना घडली होती. या दुचाकी चोरीच्या वाढत्या घटनांनी पोलिसांना चोरट्यांना पकडण्‍याचे आव्हान दिले आहे.

२८ संशयित वाहने जप्त

गँगवार व दुचाकी चोरीच्या घटना वाढल्या आहेत. या घटनांवर नियंत्रण मिळवण्यासाठी पोलीस दलाने शनिवारी संपूर्ण शहरात कोम्बींग ऑपरेशन राबविले होते. त्यात २८ संशयित वाहने पोलिसांनी जप्त केली होती. शहरातील गेंदालाल मिल, कांचननगर, जैनाबाद, पिंप्राळा हुडको, तांबापुरा, मास्टर कॉलनी आदी भागांमध्ये कोम्बींग ऑपरेशन राबविले गेले होते. जप्त वाहनांमध्ये चोरीची वाहने आहेत का? याचाही तपास पोलीस करीत आहेत.

अशा आहेत चोरीस गेलेली दुचाकी वाहने

गुन्हा दाखल तारीख दुचाकी क्रमांक

३१ मार्च १) एमएच.१९.बीसी.१०४३

१ एप्रिल १)एमएच.१९.डीई.९१६३

२) एमएच.१९.सीई.४५५०

३) एमएच.१९.बीआर.५८५५

३ एप्रिल १) एमएच.१९.सीजी.०६६३

२) एमएच.१९.बीएक्स.१३०८

५ एप्रिल १) एमएच.१९.एब्ल्यू.४५५९

६ एप्रिल १) एमएच.१९.सीडी.६१६३

८ एप्रिल १) एमएच.१९.बीझेड.४७३५

९ एप्रिल १) एमएच.१९.सीएम.२७६७

१३ एप्रिल १) एमएच.१९.डीसी.८१२२

२) एमएच.१९.बीपी.०१२६

१४ एप्रिल १) एमएच.१९.बीआर.७०३९

१६ एप्रिल १) एमएच.१९.बीझेड.९३०३

१७ एप्रिल १) एमएच.१९.बीएल.८४२३

२) एमएच.१९.एक्स.११२२

१८ एप्रिल १) एमएच.१९.एयू.२५६२

Web Title: 17 bikes stolen in 20 days

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.