१७ वर्षीय मुलीची आत्महत्या

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 30, 2019 11:35 AM2019-01-30T11:35:43+5:302019-01-30T11:36:02+5:30

मोबाईलवर बोलताना घेतला गळफास

17-year-old girl commits suicide | १७ वर्षीय मुलीची आत्महत्या

१७ वर्षीय मुलीची आत्महत्या

googlenewsNext
ठळक मुद्देमोबाईलवर भांडण झाल्याचा संशय


जळगाव : मोबाईलवर बोलत असतानाच किर्ती पवन दुसाने (वय १७) या अल्पवयीन मुलीने राहत्या घरात गळफास लावून आत्महत्या केल्याची घटना मंगळवारी दुपारी अडीच वाजता मेहरुणमधील रामनगरात घडली. आत्महत्येचे कारण स्पष्ट झालेले नाही. याप्रकरणी एमआयडीसी पोलिसात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे.
याबाबत सूत्रांनी दिलेली माहिती अशी की, किर्ती ही मेहरुणमधील श्रीराम कन्या शाळेत दहावीच्या वर्गात शिक्षण घेत होती. मंगळवारी ती शाळेत गेलेली नव्हती. वडील पवन दुसाने व आई भारती दोन्ही जण कामावर गेलेले होते. त्यामुळे किर्ती व लहान भाऊ लोकेश असे दोघेच घरी होते.
दोघांनी दीड वाजता सोबत जेवण केले. त्यानंतर लोकेश बाहेर गल्लीत खेळायला निघून गेला. दुपारी अडीच वाजता तो घरी आला असता दरवाजाची कडी आतून बंद होती. खिडकीद्वारे डोकावून पाहिले असता किर्तीने गळफास घेतला होता.
भावाने तोंडावर पाणी मारले
बहिणीने गळफास घेतल्याचे दृष्य पाहिल्यानंतर भाऊ लोकेश याने तिला आवाज दिला. प्रतिसाद मिळत नसल्याने त्याने खिडकीतून हात टाकून कडी उघडली व स्वत:च तिला खाली उतरविले. त्यानंतर तोंडावर पाणी मारले, मात्र तिचा कोणतीच हालचाल होत नव्हती.
त्याने तातडीने वडीलांना फोन करुन माहिती दिली. वडील व आई यांनी घरी येऊन शेजारच्या लोकांच्या मदतीने जिल्हा रुग्णालयात हलविले असता डॉक्टरांनी तिला मृत घोषीत केले. यावेळी आई, वडील व भावाचा प्रचंड आक्रोश सुरु होता. वडील सोनार काम करतात तर आई कंपनीत कामाला जाते. भाऊ आठवीत शिक्षण घेत आहे. दरम्यान, जिल्हा रुग्णालयात मोठी गर्दी झाली होती. नातेवाईकांचा एकच आक्रोश सुरु होता.
मोबाईलवर भांडण झाल्याचा संशय
किर्ती याचे मोबाईलवर कोणाशी तरी बोलणे सुरु होते. त्यात तिचे भांडण झाले असावे. मोबाईलवर बोलत असताना घराचा दरवाजा बंद केल्याचे शेजारच्या लोकांनी पाहिले. मात्र ती आत्महत्या करेल अशी पुसटशीही कल्पना कोणाला नव्हती. मोबाईलवर बोलत असतानाच तिने गळफास घेतला. दरम्यान, नगरसेवक गणेश सोनवणे यांनी तातडीने जिल्हा रुग्णालय गाठून किर्तीच्या आई, वडीलांना धीर दिला. उपनिरीक्षक राजकुमार ससाणे, देविदास सुरदास यांनी पंचनामा केला.

Web Title: 17-year-old girl commits suicide

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.