धावत्या पटना एक्प्रेसमधून  १७ हजारांचा ऐवज लंपास

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 13, 2020 05:36 PM2020-11-13T17:36:13+5:302020-11-13T17:38:05+5:30

बॅग केली लंपास, भुसावळजवळ प्रकार आला लक्षात

17,000 stolen from Patna Express | धावत्या पटना एक्प्रेसमधून  १७ हजारांचा ऐवज लंपास

धावत्या पटना एक्प्रेसमधून  १७ हजारांचा ऐवज लंपास

Next

भुसावळ :  कोरोना काळात  प्रत्येक रेल्वे स्थानकावर कसून चौकशी करून प्रवाशांना स्थानकात प्रवेश दिला जात असताना  रेल्वे प्रवासात होणाऱ्या चोऱ्या हा चिंतेचा विषय बनला असून पटना एक्प्रेसमधील प्रवाशाची  १७ हजारांचा ऐवज असलेली बॅग चोरट्यांनी लंपास केल्याची घटना गुरुवारी पहाटे घडली.
 तक्रारदार आफताफ आलम अन्सार (रा.नारायणगाव, जि. औरंगाबाद, बिहार) हे अप पटना सुपर एक्स्प्रेसच्या एस-२ या डब्यातून प्रवास करीत असताना  साखर झोपेत  असताना चोरट्यांनी बॅग लांबवली. बॅगेत मोबाईल, हेडफोन, सोन्याची नाकातील नथ, चांदीचे पैंजण आणि ८०० रुपये रोख असा ऐवज होता. ही घटना मध्य प्रदेशातील इटारसी रेल्वे स्थानकाजवळ घडली. 
या प्रकरणी अन्सार यांनी भुसावळ जीआरपी पोलिसांकडे दिलेल्या फिर्यादीवरून चोरीचा गुन्हा दाखल केला आहे. भुसावळ जीआरपी पोलिसांनी गुन्हा दाखल करून घेत गुरुवारी इटारसी जीआरपी पोलिसांकडे गुन्हा वर्ग   केला.
दरम्यान  शासनाचे कडक नियम दाखवणाऱ्या रेल्वेमध्ये अवैधरित्या, बेकायदेशीरपणे खाद्यपदार्थ विक्रेते चढतात तसेच चोरटेही शिरतात, मात्र सामान्य नागरिकांसाठी कडक  नियम असताना या लोकांंना सूट का असा प्रश्न  उपस्थित केला जात आहे. याची दखल घेण्याची मागणीही होत आहे. 

Web Title: 17,000 stolen from Patna Express

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.