जळगाव राज्यात १७ व्या स्थानी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 15, 2021 04:15 AM2021-04-15T04:15:39+5:302021-04-15T04:15:39+5:30
जळगाव : गेल्या काही दिवसांपासून जळगाव जिल्ह्यात कोरोनाचे रुग्ण आणि त्यासोबतच होणारे मृत्यू देखील वाढत आहे. महाराष्ट्राचा कोरोना ...
जळगाव : गेल्या काही दिवसांपासून जळगाव जिल्ह्यात कोरोनाचे रुग्ण आणि
त्यासोबतच होणारे मृत्यू देखील वाढत आहे. महाराष्ट्राचा कोरोना
रुग्णांच्या मृत्यूचा दर टक्केवारीत १.७० टक्के आहे, तर जळगाव जिल्ह्याचा मंगळवारपर्यंतचा मृत्यूदर हा १.७५ टक्के आहे. सध्या सर्वाधिक मृत्यूदराच्या यादीत जळगाव जिल्हा हा राज्यात १७ व्या स्थानावर आहे. कोरोनाचा मृत्यूदर हा गेल्या एप्रिल आणि मे महिन्यात राज्यात सर्वाधिक होता. मात्र, नंतरच्या काळात रुग्णांचे प्रमाण वाढत गेले. बरे होणारे रुग्ण देखील वाढले आणि कोरोनाच्या मृत्यूदराचे प्रमाण देखील कमी झाले.
कोरोनाने मे २०२० मध्ये जळगावचा मृत्यूदर हा राज्याच्या मृत्यूदरापेक्षा खूपच जास्त होता. त्यामुळे सर्वत्र खबराट उडाली होती. मात्र, आता हा मृत्यूदर खाली आला आहे. मागील आठवड्यात मृत्यूदर १.७८ टक्के आहे, तर रिकव्हरी रेट हा ८६.९० टक्के आहे. सध्या जिल्ह्यात कोरोनाने एकूण १८२७ जणांचा मृृत्यू झाला आहे.