जळगाव तालुक्यातील १८ शेतकºयांची ३५ लाखात फसवणूक

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 23, 2020 08:47 PM2020-07-23T20:47:29+5:302020-07-23T20:49:01+5:30

तालुक्यातील धानवड येथील १८ शेतकºयांची कापूस व्यापाºयाने तब्बल ३५ लाख ११ हजार २८९ रुपयात फसवणूक केल्याचा प्रकार उघडकीस आला असून अमोल भगवान व्यास, गोलू तिवारी, प्रदीप (सर्व रा.आयोध्या नगर, जळगाव) या तिघांविरुध्द एमआयडीसी पोलीस ठाण्यात बुधवारी रात्री गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या प्रकरणी गोलु तिवारी या व्यापाºयाला पोलिसांनी अटक केली आहे.

18 farmers in Jalgaon taluka cheated for Rs 35 lakh | जळगाव तालुक्यातील १८ शेतकºयांची ३५ लाखात फसवणूक

जळगाव तालुक्यातील १८ शेतकºयांची ३५ लाखात फसवणूक

googlenewsNext
ठळक मुद्देएकास अटक तीन व्यापाºयांविरुध्द गुन्हा दाखल

जळगाव : तालुक्यातील धानवड येथील १८ शेतकºयांची कापूस व्यापाºयाने तब्बल ३५ लाख ११ हजार २८९ रुपयात फसवणूक केल्याचा प्रकार उघडकीस आला असून अमोल भगवान व्यास, गोलू तिवारी, प्रदीप (सर्व रा.आयोध्या नगर, जळगाव) या तिघांविरुध्द एमआयडीसी पोलीस ठाण्यात बुधवारी रात्री गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या प्रकरणी गोलु तिवारी या व्यापाºयाला पोलिसांनी अटक केली आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, जळगाव शहरातील आयोध्या नगरातील तीन व्यापाºयांनी पंधरा दिवसात पैसे देतो असे सांगून तालुक्यातील धानवड येथील १८ शेतकºयांचा ४ हजार ७०० रुपये दराने कापूस खरेदी केला. २९ मे ते ९ जून या कालावधीत हा कापूस खरेदी झाला आहे. पंधरा दिवसाचा कालावधी पूर्ण झाल्यानंतरही या व्यापाºयांनी पैसे देण्यास टाळाटाळ केली. त्यामुळे शेतकºयांनी एमआयडीसी पोलीस स्टेशन गाठून आपली कैफियत मांडली. वाल्मिक एकनाथ पाटील (४०)यांच्या फिर्यादीवरुन अमोल भगवान व्यास, गोलू तिवारी, प्रदीप (पुर्ण नाव माहिती नाही)या तीन व्यापाºयांविरोधात एमआयडीसी पोलीस ठाण्यात फसवणुकीचा गुन्हा दाखल करण्यात आला.

या शेतकºयांची झाली फसवणूक (कंसात कापूस व रक्कम)
वाल्मिक एकनाथ पाटील (५० क्विंटल- २ लाख ३५ हजार), पंढरीनाथ बाबुराव पाटील  (८४ क्विंटल- ३ लाख ९६ हजार), कैलास आत्माराम पाटील  (११० क्विंटल- ५ लाख १७ हजार), बाबुराव तुळशीराम पाटील  (६१ क्विंटल- २ लाख ८६ हजार), पंडीत मधुकर पाटील  (९७ क्विंटल- २ लाख ५० हजार), रंगनाथ यशवंत पाटील  (२१ क्विंटल- ९८ लाख ७००), समाधान भाऊराव पाटील  (५२ क्विंटल- २ लाख ४८ हजार), शांताराम एकनाथ पाटील  (३७ क्विंटल- १ लाख ४५ हजार), राजेंद्र शिवराम पाटील  (५३ क्विंटल- २ लाख ५१ हजार), बापू सदाशिव भावसार  (१२.७७ क्विंटल- ६० हजार), प्रभुदास बाबुराव पाटील  (८६ क्विंटल- २ लाख), नामदेव  गोविंदा पाटील  (३९ क्विंटल- १ लाख ), अशोक शेनफडू पाटील (३ लाख २३ हजार), राजाराम लक्ष्मण आवारे  (२० क्विंटल- ९६ हजार), अर्जुन लक्ष्मण आवारे  (६४ क्विंटल- २ लाख ५४ हजार), सखाराम लक्ष्मण आवारे (३९ हजार), बंडू गोबा पाटील (२१ क्विंटल- १ लाख १ हजार), नाना माधव पाटील (६ क्विंटल- २८ हजार), चंद्रकांत नामदेव आवारे  (२७ क्विंटल- १ लाख) या १८ शेतकºयांकडून एकुण ३५ लाख ११ हजार २८९ रुपयांमध्ये फसवणूक केली.

Web Title: 18 farmers in Jalgaon taluka cheated for Rs 35 lakh

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.