१८ तात्पुरत्या नळ योजनांना मंजुरी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 30, 2019 11:27 AM2019-01-30T11:27:59+5:302019-01-30T11:28:58+5:30

३ वर्षात ६ गावे झाली टँकरमुक्त

 18 temporary sanction plans approved | १८ तात्पुरत्या नळ योजनांना मंजुरी

१८ तात्पुरत्या नळ योजनांना मंजुरी

Next
ठळक मुद्देपाणीटंचाई

जळगाव : जिल्हा दुष्काळी जाहीर झाला असून टंचाईची परिस्थिती यंदा नेहमीपेक्षा अधिक गंभीर असल्याने मोठ्या प्रमाणावर पाणीटंचाई जाणवणार आहे. त्यामुळे आतापर्यंत २१३ गावांना टँकर सुरू करण्यासह २२८ विविध उपाययोजना करण्यात आल्या आहेत. त्यात १८ गावांसाठी १ कोटी ५४ लाख रूपये खर्चाच्या १८ तात्पुरत्या नळपाणी योजनांना मंजुरी देण्यात आली आहे.
या गावांना नळपाणी योजना मंजूर
यंदा तात्पुरती नळपाणी योजना मंजूर करण्यात आलेल्या गावांमध्ये जळगाव तालुक्यातील जवखेडे, रामदेववाडी, जामनेर तालुक्यातील पाळधी, भडगाव तालुक्यातील कजगाव, पथराड, बात्सर, ग्रा.पं. अंचळगाव अंतर्गत धोत्रे, चाळीसगाव तालुक्यातील देशमुखवाडी, अलवाडी, पाटखडकी एमएसईबी सबस्टेशन, खडकी बु., डामरूण,भामरे, एरंडोल तालुक्यातील वनकोठे, आनंदनगर, धरणगाव तालुक्यातील सोनवद बु., भुसावळ तालुक्यातील कन्हाळे बु., पाचोरा तालुक्यातील कºहाड बु.(लाखतांडा) या गावांचा समावेश आहे. या १८ गावांमधील ४६ हजार २०३ लोकसंख्येला यामुळे दिलासा मिळणार आहे.
६ गावे झाली टँकरमुक्त
तात्पुरत्या नळपाणीपुरवठा योजनांमुळे गत तीन वर्षात ६ गावे टँकरमुक्त झाली आहेत. २०१५-१६ या वर्षात जळगाव तालुक्यातील शिरसोली प्र.न., जामनेर तालुक्यातील कालखेडा, चाळीसगाव तालुक्यातील कळमडू, अमळनेर तालुक्यातील टाकरखेडे, पारोळा तालुक्यातील कन्हेरे, तर २०१६-१७ या वर्षात मुक्ताईनगर तालुक्यातील हरताळे अशी ७ गावे टँकरमुक्त झाली आहेत.
टँकरच्या खर्चात बचत
टंचाई कालावधीतील तात्पुरत्या नळपाणी पुरवठा योजनांमुळे टँकरचा खर्च वाचत असल्याचे जिल्हा प्रशासनाच्या आकडेवारीवरून आढळून आले आहे. पाणी टंचाई कालावधी २०१५-१६ मध्ये पाचोरा व अमळनेर या शहरांसाठी तातडीच्या पाणीपुरवठा योजना शासनाने मंजूर केल्या होत्या. त्यामुळे टंचाई कालावधीत या शहरांना पाणीपुरवठा करण्यासाठी आवश्यक किमान ५० टँकरच्या खर्चात बचत झाली होती.

Web Title:  18 temporary sanction plans approved

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.