181 केंद्रांवर मतदानाची तयारी पूर्ण

By Admin | Published: February 15, 2017 11:27 PM2017-02-15T23:27:10+5:302017-02-15T23:27:10+5:30

केंद्रावर झाली प्रात्याक्षिक : अधिकारी व कर्मचारी निवडणुकीच्या साहित्यासह केंद्रावर दाखल

181 centers full of polling | 181 केंद्रांवर मतदानाची तयारी पूर्ण

181 केंद्रांवर मतदानाची तयारी पूर्ण

googlenewsNext

जळगाव : जिल्हा परिषदेच्या जळगाव तालुक्यातील पाच गट व पंचायत समितीच्या 10 गणांच्या निवडणुकीची जिल्हा प्रशासनाने तयारी पूर्ण केली आहे. बुधवारी दुपार्पयत मतदानासाठी आवश्यक साहित्य घेऊन मतदान अधिकारी व कर्मचारी केंद्राकडे रवाना झाले.
तालुक्यात 181 मतदान केंद्र
जळगाव तालुक्यातील पाच जिल्हा परिषद गट व 10 पंचायत समिती गणांसाठी निवडणूक होत आहे. 
कानळदा-भोकर गटात 39, ममुराबाद-आसोदा गटात 34, शिरसोली-चिंचोली गटात 36, नशिराबाद-भादली गटात 35, म्हसावद-बोरणार गटात 37 मतदान केंद्र आहेत. प्रत्येक मतदान केंद्रावर 6 अधिकारी व कर्मचा:यांची नियुक्ती करण्यात आली आहे.
प्रत्येक केंद्रावर 4 मशीन                             व 2 मतदान कक्ष
तालुक्यातील 181 मतदान केंद्रावर प्रत्येकी 4 मशीन देण्यात आले आहेत. त्यात दोन कंट्रोल मशीन तर दोन बॅलेट मशीनचा समावेश आहे. प्रत्येक मतदान केंद्रावर दोन मतदान कक्ष राहणार आहेत.  या केंद्रांसाठी 796 इलेक्ट्रॉनिक मशीनचे वितरण अधिकारी व कर्मचा:यांना करण्यात आले.
नूतन मराठा महाविद्यालयात           साहित्य वाटप
निवडणुकीसाठी नियुक्त अधिकारी व कर्मचा:यांना बुधवारी सकाळी 11 वाजता नूतन मराठा महाविद्यालयात साहित्य वाटप करण्यात आले.
या ठिकाणी निवडणूक निर्णय अधिकारी जलज शर्मा, साहाय्यक निवडणूक निर्णय अधिकारी अमोल निकम यांनी मतदान केंद्रावर पोहचल्यानंतर काय दक्षता घ्यावी याबाबत सूचना केली. मतदानापूर्वी केंद्रावर प्रात्याक्षिक करण्याची सूचना त्यांनी अधिकारी व कर्मचा:यांना केली.
मतदान केंद्रावर विजेची व पाण्याची व्यवस्था आहे किंवा नाही याची सुरुवातीला खात्री करण्याची सूचना त्यांनी केली.
झोन निहाय साहित्याचे वितरण
जिल्हा प्रशासनाने तालुक्यातील गट व गणासाठी झोन निहाय व्यवस्था केली होती.
जि.प.गट व गण तसेच त्यातील मतदान केंद्राची माहिती डिजिटल बॅनरवर लावलेली असल्याने साहित्य वितरण सुरळीत आणि चांगल्या पद्धतीने झाले. साहित्य घेतल्यानंतर कर्मचा:यांना सूचना देऊन तत्काळ रवाना केले जात होते.

50 खाजगी वाहनांचे अधिग्रहण
मतदान साहित्य तसेच अधिकारी व कर्मचा:यांना मतदान केंद्रावर सोडण्यासाठी 12 एस.टी.बसची मागणी केली होती. यासह 25 स्कूल बस व 25 खाजगी बस अशा 50 वाहनांचे उपप्रादेशिक परिवहन कार्यालयामार्फत अधिग्रहण केले होते.
19 केंद्र संवेदनशील : तालुक्यातील 181 मतदान केंद्रापैकी 19 केंद्र संवेदनशील आहेत. त्यात धानवड, मोहाडी, नशिराबाद, कंडारी, ममुराबाद या गावांचा समावेश आहे.
असा आहे बंदोबस्त : पोलीस अधीक्षक : 1, अपर पोलीस अधीक्षक : 2, उपअधीक्षक : 15, पोलीस निरीक्षक : 48, सहायक निरीक्षक : 175, पोलीस कर्मचारी : 3810, होमगार्ड : 2000 एसआरपीएफ कंपनी : 1, आरसीपी प्लाटून : 8 क्यूआरटी प्लाटून : 8, स्ट्रायकिंग फोर्स : 8, भरारी पथक : 15 , स्टॅटीक पॉँईट : 15, चेक पोस्ट : 12 असा बंदोबस्त आहे.

 

Web Title: 181 centers full of polling

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.