चोर सोडून संन्याशाला फाशी, अपंग युनिटप्रकरणी जळगावातील १८१ शिक्षकांची भावना

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 14, 2018 12:58 PM2018-03-14T12:58:14+5:302018-03-14T12:58:14+5:30

९४ बोगस शिक्षकांची चौकशी करण्याची मागणी

181 teachers feel disabled | चोर सोडून संन्याशाला फाशी, अपंग युनिटप्रकरणी जळगावातील १८१ शिक्षकांची भावना

चोर सोडून संन्याशाला फाशी, अपंग युनिटप्रकरणी जळगावातील १८१ शिक्षकांची भावना

Next
ठळक मुद्देवारंवार चौकशी करुन त्रास देवू नकासमायोजित शिक्षकांविषयी संभ्रमाचे व संशयाचे वातावरण

आॅनलाइन लोकमत
जळगाव, दि. १४ - अपंग युनिट प्रकरणी खरी सेवा बजावलेल्या व समायोजित झालेल्या १८१ शिक्षकांना विनाकारण चौकशीस सामारे जावे लागत असण्यासह वेठीस धरले जात असल्याचा आरोप जळगाव जिल्हा अपंग एकात्म युनिट अंतर्गत समायोजित प्राथमिक स्तर व शिक्षक/परिचर कृती समितीने केला आहे. यामध्ये जे बोगस ९४ शिक्षक आहेत, त्यांची चौकशी करण्यात येऊन त्यांच्यावर कारवाई करण्यात यावी, अशी मागणीदेखील या समितीने प्रसिद्धीस दिलेल्या पत्रकाद्वारे केली आहे.
अपंग युनिटचे राज्यात ५९५ शिक्षक होते, त्यात जळगाव जिल्ह्यातील १८१ शिक्षकांच्या सर्व कागदपत्रांची पडताळणी करून २००९मध्ये त्यांचे जि.प.कडे समायोजन करण्यात आल्याचे या समितीचे म्हणणे आहे. तशी यादीही संबंधित विभागांना पाठविण्यात आली. २०१५ नंतर एकही शिक्षक समायोजनाचा बाकी नसल्याचे समितीच्यावतीने सांगण्यात आले.
वारंवार चौकशी करुन त्रास देवू नका
गेल्या सहा ते सात वर्षांपासून हे १८१ शिक्षक जि.प. अतंर्गत प्राथमिक शिक्षक म्हणून काम करीत आहे, मात्र ८ व ९ फेब्रुवारी २०१८ रोजी पुन्हा युनिटवरील व शैक्षणिक मूळ कागपत्रांची तपासणी करण्यात आली, त्यानंतर गट शिक्षणाधिकाºयांनीही तपासणी केली. याबाबतचा अहवाल चौकशी समितीने जि.प. सादर केला. मात्र तरीदेखील आम्हाला वारंवार चौकशीस सामोरे जावे लागत असल्याने त्याचा मानसिक त्रास होत असल्याचे समितीचे म्हणणे आहे. यात ९४ बोगस शिक्षकांच्या यादीमुळे सरसकट सर्वच युनिटमधील समायोजित शिक्षकांविषयी संभ्रमाचे व संशयाचे वातावरण तयार झाले असून चोर सोडून संन्याशाला फाशी अशी गत केल्याची भावना समितीतील पदाधिºयांनी केली आहे. मानसिक त्रासाला कंटाळून जीवाचे काही बरे वाईट केल्यास कोण जबाबदार, असा सवालही समितीने उपस्थित केला आहे.
चौकशीतील संभ्रमाचे वातावरण दूर करून संबंधित ९४ बोगस शिक्षक, अधिकारी, संस्थाचालक, दलाल यांच्यावर कडक कारवाई करण्याची मागणीदेखील समितीच्यावतीने नाना पाटील, विश्वासराव पाटील यांनी केली आहे.

Web Title: 181 teachers feel disabled

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.