आदिवासी विद्यार्थी असलेल्या जळगाव जिल्ह्यातील ९८ शाळांमध्ये बांधणार १८८ शौचालये
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 20, 2018 05:14 PM2018-02-20T17:14:52+5:302018-02-20T17:17:01+5:30
रावेर व यावल तालुक्यातील शाळांसाठी हिंदुस्थान पेट्रोलियम कडून ३ कोटी २९ लाखांचा निधी मिळणार
आॅनलाईन लोकमत
जळगाव, दि. २० - हिंदुस्थान पेट्रोलियम कापोर्रेशन लि.मुंबई ने रावेर व यावल तालुक्यातील ९८ शाळांमध्ये १८८ शौचालये बांधण्यासाठी ३ कोटी २९ लाख रुपये उपलब्ध करुन दिल्याची माहिती जिल्हाधिकारी किशोर राजे निंबाळकर यांनी मंगळवारी दिली.
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या स्वच्छ भारत अभियानास प्रतिसाद तसेच रावेर, यावल या आदिवासी तालुक्यातील मुलांना शालेय जीवनापासूनच स्वच्छतेची सवय लागावी. यासाठी हिंदुस्थान पेट्रोलियम कापोर्रेशन लि. मुंबई ने या तालुक्यातील शाळांमध्ये शौचालये बांधण्याचा निर्णय घेतला आहे. याबाबत मंगळवारी मुंबई येथे एचपीसीएलचे महाव्यवस्थापक झाकीर मोल्ला व जिल्हा प्रशासनात करार झाला.
रावेर व यावल तालुक्यातील ज्या शाळांमध्ये आदिवासी विद्यार्थी संख्या जास्त आहे. अशा ९८ शाळांची निवड शौचालये बांधण्यासाठी करण्यात येणार आहे. तसेच लवकरच शौचालयांचे बांधकाम सुरु करण्यात येणार आहे.