जिल्ह्यात १९ भरडधान्य खरेदी केंद्र मंजूर
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 21, 2020 09:23 PM2020-10-21T21:23:03+5:302020-10-21T21:23:16+5:30
१ नोव्हेंबरपासून आधारभूत किंमतीनुसार खरेदी
जळगाव : खरीप पणन हंगाम २०२०-२१ मध्ये किमान आधारभूत किंमत खरेदी योजनेअंतर्गत भरडधान्य (ज्वारी, मका, बाजरी) खरेदी करण्याचा निर्णय घेतलेला आहे. यासाठी जळगाव जिल्ह्यात १९ भरडधान्य खरेदी केंद्र मंजूर केले आहे. या योजनेतंर्गत १ नोव्हेंबर ते ३१ डिसेंबर २०२० या कालावधीत आधारभूत किंमतीत व भरडधान्याच्या गुणवत्ता व दर्जानुसार खरेदी करण्यात येणार आहे, असे जिल्हाधिकारी अभिजित राऊत यांनी सांगितले.
संकरीत ज्वारीसाठी आधारभूत किंमत व शेतकऱ्यांना प्रत्यक्ष द्यावयाचा दर हा २६२० रुपये आहे. मालदांडी ज्वारीसाठी २६४० रुपये, बाजरीसाठी २१५०रुपये, मकासाठी १८५० रुपये आहे.
भरडधान्य खरेदीकरीता तालुकानिहाय खरेदी केंद्रांचा तपशील
जळगाव : जळगाव तालुका शेतकरी सहकारी खरेदी विक्री संघ. लि. जळगाव, जळगाव जिल्हा कृषी औद्योगिक सर्व सेवा सह संस्था मर्या
अमळनेर : अमळनेर तालुका शेतकी सहकारी संघ लि.
पारोळा : पारोळा तालुका शेतकरी सहकारी संघ लि.
चोपडा : चोपडा तालुका शेतकरी सहकारी संघ लि.
धरणगाव : अमळनेर तालुका शेतकरी सहकारी संघ लि.
एरंडोल : एरंडोल तालुका शेतकरी सहकारी संघ लि.
यावल : कोरपावली विविध कार्यकारी सेवा सहकारी. संघ लि.
रावेर : रावेर तालुका शेतकरी सहकारी संघ. लि.
मुक्ताईनगर : मुक्ताईनगर तालुका शेतकरी सहकारी संघ लि.
बोदवड : बोदवड को. ऑप. खरेदी विक्री युनि.लि.
भुसावळ : भुसावळ तालुका शेतकरी सहकारी संघ लि.
जामनेर : जामनेर तालुका शेतकरी सहकारी संघ.लि.
पाचोरा : शेतकरी सहकारी संघ लि. पाचोरा.
भडगाव : शेतकरी सहकारी संघ लि.
चाळीसगाव : शेतकरी सहकारी. संघ लि. भडगाव.
शेंदुर्णी : शेंदुर्णी सहकारी खरेदी विक्री जिनिंग प्रेसिंग सोसा लि.
याप्रमाणे १७ केंद्र आहेत तर आदिवासी विकास महामंडळ मर्या. प्रादेशिक कार्यालय नंदुरबार यांच्यामार्फत यावल-आदिवासी विकास विविध कार्यकारी सहकारी संस्था, हरीपुरा, ता. यावल व चोपडा-आदिवासी विकास विविध कार्यकारी सहकारी संस्था, कर्जाणा, ता. चोपडा याप्रमाणे दोन केंद्र मंजूर आहेत.
जिल्ह्यातील आदिवासी व बिगर आदिवासी क्षेत्रातील एकूण १९ भरडधान्य खरेदी केंद्रासाठी उप अभिकर्त्या संस्थांना मंजुरी देण्यात आली असून अधिक तपशीलासाठी संबंधित खरेदी केंद्राशी संपर्क साधावा, असे आवाहन जिल्हाधिकारी अभिजित राऊत यांनी केले आहे.