पाण्यातून १९ जणांना विषबाधा

By admin | Published: March 4, 2017 12:53 AM2017-03-04T00:53:55+5:302017-03-04T00:53:55+5:30

अजंतीसीम येथील प्रकार : उपजिल्हा रुग्णालयात उपचार सुरू

19 people poisoning in water | पाण्यातून १९ जणांना विषबाधा

पाण्यातून १९ जणांना विषबाधा

Next

चोपडा : तालुक्यातील  अजंतीसीम येथील भिल्ल वस्तीतील  १९ जणांना पाण्यातून विषबाधा झाली आहे. या सर्वांना उलट्या व संडास होऊन ताप आल्याने त्यांना उपजिल्हा रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे.
तालुक्यातील अजंतीसीम येथे गावाला पाणीपुरवठा करणाºया पाईपलाईनमध्ये विषारी पदार्थ  आल्याने भिल्ल वस्तीतील १९ जणांना २ रोजी दुपारी विषबाधा झाली. या सर्वांना मळमळ, उलट्या, संडास होऊ लागली. यापैकी काहींना होळनाथे (ता.शिरपूर) व काहींना हातेड बुद्रूक येथील प्राथमिक आरोग्य केंद्रात दाखल करण्यात आले होते. मात्र, शुक्रवारी या सर्व रुग्णांना चोपडा उपजिल्हा रुग्णालयात उपचारार्थ दाखल करण्यात आले आहे.  रुग्णांवर  उपजिल्हा रुग्णालयाचे वैद्यकीय अधिकारी डॉ.मनोज पाटील, डॉ. गुरुप्रसाद वाघ, डॉ. पंकज पाटील यांनी उपचार केले आहेत. या सर्वांच्या प्रकृतीत सुधारणा होत आहे.
दरम्यान, पाण्याचा नमुना घेतला असता पाणी पिण्यायोग्य असल्याचे, वढोदा उपकेंद्राचे डॉ. दिनेश निळे यांनी सांगितले.
 नेमके कारण शोधण्यास
 यंत्रणा अपुरी
 गावातील प्रकार हा आदिवासी गरीब परिवारांमध्ये झाला म्हणून याकडे कोणीही गांभीर्याने पाहिले नाही. हातेड आरोग्य केंद्रातून सुटका करून रुग्ण उपजिल्हा रुग्णालयात भरती होत आहेत. हाच प्रकार गावातील उच्चभ्रू वस्तीत घडला असता तर आरोग्य, प्रशासन, पदाधिकारी अशा सर्व यंत्रणा कामाला लागल्या असत्या, असा आरोप रुग्णांच्या नातेवाइकांनी केला आहे.
दरम्यान, प्रत्येक रुग्णास हजार-हजार रुपयांची आर्थिक मदत देण्याची मागणी लालबावटा शेतमजूर युनियनचे राज्य सहसचिव कॉ. अमृतराव महाजन यांनी केली आहे.                       (वार्ताहर)
सुंदरबाई ज्ञानेश्वर भिल (२२), ज्ञानेश्वर तुकाराम भिल (२८),  सुनील रघुनाथ भिल (१६), कमल सखाराम भिल (२७) , छोट्या गणेश भिल (२०), संदीप सखाराम भिल (२५), विनोद वेडू भिल (३५), हरी तुकाराम भिल (६०), योगिता शांताराम भिल (७), मोतीलाल सखाराम भिल (४०), ममता मोतीलाल भिल (१७), रुपाली विनोद भिल(९), सरला कैलास भिल (२६), सखाराम दुला भिल (५५), विमल हरी भिल (२५), सोनू ज्ञानेश्वर भिल (७), दीपक शांताराम भिल (१८), समाधान सखाराम भिल (१८), गोकूळ मोतीराम भिल (२२), दीपक शांताराम भिल (१४, सर्व रा. अजंतीसीम) यांचा समावेश आहे.
 यातील काही मंडळी सत्रासेन येथे लग्नाला गेली होती. तेथून आल्यावर हा प्रकार घडल्याने अन्नातून विषबाधा झाली असावी.
                   -डॉ.आशिष सोनवणे.
वैद्यकीय अधिकारी, प्रा.आ.केंद्र हातेड.
गावात बंद गटारी आहेत. कुठेही पाईपलाईन लिकेज नाही. सर्वत्र स्वच्छता आहे.
                        -एस.एन.सोनवणे,
ग्रामसेवक अजंतीसीम
 अजंतीसीम येथील रुग्णांना पाण्यातून अथवा अन्नातून विषबाधा झाली असावी.
                     -डॉ. गुरुप्रसाद वाघ,
उपजिल्हा रुग्णालय, चोपडा.

Web Title: 19 people poisoning in water

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.