जळगाव येथील वैद्यकीय महाविद्यालयात 19 पदांची भरती, सुविधा वाढविण्यावर भर
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 16, 2017 12:30 PM2017-11-16T12:30:09+5:302017-11-16T12:32:56+5:30
77 जागांसाठी 23 अर्ज
ऑनलाईन लोकमत
जळगाव, दि. 16 - नियोजित वैद्यकीय महाविद्यालयासाठी आणि रुग्णालयासाठी आज 19 पदांवर डॉक्टरांची नियुक्ती करण्यात आली. यासाठी वैद्यकीय महाविद्यालयाचे अधिष्ठाता डॉ. भास्कर खैरे यांच्या नेतृत्वात मुलाखत प्रक्रिया पार पडली.
जळगाव येथे शासकीय वैद्यकीय महाविद्यालय मंजूर झाले असून पुढील वषार्पासून हे महाविद्यालस सुरु होणार आहे. यासाठी सर्व पदस्थापना वेळेत करण्याची कार्यवाही सुरु आहे. यासाठी 77 जागांसाठी अर्ज मागविण्यात आले होते. यामध्ये आज 23 जणांच्या मुलाखती घेण्यात आल्या. त्यातून 19 जणांची निवड झाली.
आज निवड झालेल्यांमध्ये पदानुसार सहाय्यक प्राध्यापक 5, वरिष्ठ निवासी डॉक्टर 5, कनिष्ठ निवासी डॉक्टर 6 आणि भिषक 3 आहेत. विषयनिहाय पदे अशी - मेडिसीन 2, सर्जरी 2, ईएनटी 1, नेत्र 1, भूलतज्ज्ञ 3, डीजेओ 1, त्वचारोग 1, मनोविकार,1 जीवरसायन 1 आणि शरीररचना 1. भूलतज्ज्ञांच्या रिक्त जागा भरल्यामुळे आता रुग्णालयात शस्त्रक्रियांची संख्या वाढेल.
या मुलाखती अधिष्ठाता खैरे यांच्यासह डॉ. संजय गायकवाड, डॉ. हेमंत चौधरी, वैद्यकीय महाविद्यालयाचे प्रशासकीय आधिकारी महेश्वर अनमोड आदींनी घेतल्या.
वैद्यकीय महाविद्यालयासाठी विविध पदे भरली जात असून यामध्ये आज 19 पदे भरण्यात आली.
- डॉ. बी.एस. खैरे, अधिष्ठाता वैद्यकीय महाविद्यालय