जळगाव जिल्ह्यात प्रधानमंत्री मातृवंदना योजनेचा १९ हजार महिलांना लाभ
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 11, 2019 04:38 PM2019-02-11T16:38:29+5:302019-02-11T16:40:36+5:30
केंद्र शासनाची महत्वाकांक्षी असलेली प्रधानमंत्री मातृवंदना योजना सुरू झाल्यापासून ४८२ दिवसांमध्ये जिल्ह्यात १९ हजार २७० महिला लाभार्र्थींना ६ कोटी ४ लाख ६० हजार रुपयांचे अनुदान वितरित करण्यात आले आहे.
अजय कोतकर
लोकमत न्यूज नेटवर्क
गोंडगाव, ता.भडगाव, जि.जळगाव : केंद्र शासनाची महत्वाकांक्षी असलेली प्रधानमंत्री मातृवंदना योजना सुरू झाल्यापासून ४८२ दिवसांमध्ये जिल्ह्यात १९ हजार २७० महिला लाभार्र्थींना ६ कोटी ४ लाख ६० हजार रुपयांचे अनुदान वितरित करण्यात आले आहे.
प्रधानमंत्री मातृवंदना योजना ग्रामीण व शहरी भागात लागू करण्यात आली आहे. भारतातील दारिद्र्य रेषेखालील व दारिद्र्यरेषेवरील अनेक गर्भवती महिलांना गरोदरपणाच्या शेवटच्या टप्प्यापर्यंत मजुरीसाठी काम करावे लागते. त्यामुळे अशा गर्भवती महिला व माता कुपोषित राहून त्यांचे व नवजात बालकांचे आरोग्य सुधारण्याच्या दृष्टीने गर्भवती माता व स्तनदा मातेला सकस आहार घेण्यास प्रोत्साहित करून त्यांच्या आरोग्यात सुधारणा व्हावी व जन्माला येणाºया नवजात बालकांचेही आरोग्य सुधारावे आणि मातामृत्यू व बालमृत्यू दरात घट होऊन तो नियंत्रित रहावा यासाठी केंद्र शासनाच्या महिला व बालविकास मंत्रालयाने प्रधानमंत्री मातृवंदना संपूर्ण देशात १ जानेवारी २०१७ पासून कार्यान्वित केली आहे.
या योजनेंतर्गत पहिल्यांदा ज्या मातांची प्रसूती झाली आहे किंवा गर्भधारणा झाली असेल व त्यांनी शासनाने अधिसूचित केलेल्या संस्थेत नोंदणी केली असेल अशाच पात्र महिलांना या योजनेतून त्यांच्या बँक खात्यावर पाच हजार रुपयांचा लाभ पहिल्या जिवंत अपत्यासाठी तीन टप्प्यात देण्यात येतो. पहिल्या टप्प्यात मासिक पाळीच्या शेवटच्या तारखेपासून १५० दिवसात गर्भधारणा नोंदणी केल्यास १ हजार रुपये, दुसरा हप्ता किमान एकदा प्रसवपूर्व तपासणी केल्यास गर्भधारणेच्या सहा महिन्यांनंतर २ हजार रुपये व तिसरा हप्ता बाळाचे जन्मनोंद प्रमाणपत्र तसेच बाळाला १४ आठवड्यापर्यंतचे प्राथमिक लसीकरण पूर्ण झाल्याचा दाखला मिळाल्यानंतर २ हजार रुपये लाभार्र्थींच्या खात्यात जमा करण्यात येतो.या योजनेचा लाभ शासकीय सेवेत असणाºया माता वगळून इतर सर्व मातांना देय आहे.
योजनेसाठी आवश्यक कागदपत्रे
योजनेचा लाभ मिळविण्यासाठी लाभार्थी व तिच्या पतीचे आधारकार्ड, लाभार्थीचे आधारकार्ड, बँक खाते, गरोदरपणाची शासकीय आरोग्य संस्थेत १५० दिवसांच्या आत नोंदणी प्रमाणपत्र, शासकीय संस्थेत गरोदर दरम्यान तपासणी प्रमाणपत्र याव्यतिरिक्त जननी सुरक्षा योजनेंतर्गत पत्र लाभार्र्थींना शासकीय तसेच शासनमान्य रुग्णालयात बाळंतपण झाले असल्यास मिळणारे आर्थिक सहाय्यदेखील मिळतात.
गर्भवती महिलांमध्ये एकूण स्रियांपैकी ३० टक्के माता आजही बाळंतपणादरम्यान जोखमीच्या उंबरठ्यावर असतात. प्रसंगी दर लाख गर्भवती मातांमध्ये १०० माता दगावतात. यामुळे गरोदरपणातील आजारपण व बाळंतपणातील मृत्यू हे धोके टाळण्यासाठी आहारदेखील महत्त्वाचा आहे. अटींची पूर्तता करून योजनेचा लाभ लाभार्र्थींच्या खात्यावर जमा करण्यात येतो.
या योजनेंतर्गत जिल्ह्यात गेल्या दोन वर्षात जिल्ह्यातील १९ हजार २७० महिला लाभार्र्थींना ६ कोटी ४ लाख ६० हजार रुपयांचे अनुदान वितरित करण्यात आले आहे. उर्वरित लाभार्र्थींचे उद्दिष्ट पूर्ण करण्यासाठी तालुकानिहाय तालुका आरोग्याधिकारी, वैद्यकीय अधिकारी तसेच तालुका समूह संघटक आशा कर्मचाºयांना याबाबत सूचना देण्यात आल्या आहेत.
-डॉ. बबिता कामलापूरकर, जिल्हा आरोग्य अधिकारी, जि. प., जळगाव