१९ हजार घरकुलांची कामे बाकी, आता युद्धपातळीवर करणार कामे
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 21, 2021 04:12 AM2021-07-21T04:12:45+5:302021-07-21T04:12:45+5:30
स्टार ९४० आनंद सुरवाडे जळगाव : प्रधानमंत्री आवास योजनेअंतर्गत एकूण मंजूर घरकुलांपैकी १८ हजार ९१९ घरकुलांची कामे बाकी आहेत. ...
स्टार ९४०
आनंद सुरवाडे
जळगाव : प्रधानमंत्री आवास योजनेअंतर्गत एकूण मंजूर घरकुलांपैकी १८ हजार ९१९ घरकुलांची कामे बाकी आहेत. येत्या तीन महिन्यांत हे काम युद्धपातळीवर करण्याच्या सूचना जिल्हा परिषदेचे सीईओ डॉ. पंकज आशिया यांनी नुकत्याच झालेल्या बैठीकत दिल्या आहेत. दरम्यान, जिल्ह्यातील एकूण उद्दिष्टांपैकी गेल्या पाच वर्षांत ६३ टक्के घरकुलांची कामे पूर्ण झाली आहेत. यात अनेक लाभार्थी अद्याप दुसऱ्या हप्त्याच्या प्रतीक्षेत आहेत.
प्रस्ताव मंजूर : ५४४९५
घरकुले पूर्ण : ३५५९२
पहिला हप्ता मिळालेले लाभार्थी : ५२५८८
तीन हप्ते मिळालेले लाभार्थी : ३७१८७
चार हप्ते मिळालेले लाभार्थी : ३५५९२
किती अनुदान मिळते : १५००००
१२००० चार हप्ते, नरेगातून १८००० हजार, अन्य १२०००
असे असतात हप्ते
यात घरकुल मंजूर झाल्यानंतर १५ हजार रुपयांचा पहिला हप्ता दिला जातो. त्यानुसार पुढील बांधकामांची परिस्थिती बघण्यासाठी इंजिनअर येतात. त्यात आवास ॲपवर याचे फोटो अपलोड केल्यानंतर दुसरा ४५ हजारांचा हप्ता लाभार्थींना दिला जातो. त्यानंतर तिसरा हप्ता हा ४० हजारांचा दिला जातो. यानंतर नरेगाअंतर्गत काही निधी, असे एकूण दीड लाखांचे अनुदान यात दिले जाते.
नुकताच ई - गृहप्रवेश
जिल्ह्यात घरकुलांमध्ये अन्य जिल्ह्यांच्या तुलनेत कामगिरी चांगली असल्याने मुख्यमंत्र्यांच्या हस्ते मोहाडी येथील लाभार्थींना चाव्या सोपवून ई गृहप्रवेश करण्यात आला होता. यात पाच लाभार्थींची निवड प्रातिनिधिक स्वरूपात करण्यात आली होती. त्यानंतर लाभार्थींनी शासनाचे आभार मानले होते.
अनुदान कमी, वस्तू महाग
साहित्याच्या किमती वाढलेल्या असताना सरकारकडून मिळणारे अनुदान मात्र कमी असल्याने यात अडचणी येत असल्याचीही व्यथा लाभार्थींकडून मांडली जात आहे. यात वाळू मिळणे कठीण होत आहे. अशा स्थितीत करणार काय? असाही प्रश्न उपस्थित केला जात आहे.
कोट
येत्या तीन महिन्यांत मिशन मोडवर घरकुलांची कामे पूर्ण करायची आहेत. यात बीडीओ स्तरावर नियोजन करण्यात येत आहे. युद्धपातळीवर ही कामे होणार आहे. शंभर टक्के मंजुरी आणि शंभर टक्के कंप्लिशन अशा पद्धतीने घरकुले पूर्ण करणार आहोत. दरम्यान, कामे पूर्ण झाल्यानंतर निधी वितरित केला जातो. निधी कधीच थांबत नाही.
- डी. आर. लोखंडे, प्रकल्प संचालक, डीआरडीए
मंजूर घरकुले
२०१८- ४५८६
२०१९- १५००७
२०२०- १२५४१