१९४ जणांना कुत्र्यांचा चावा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 8, 2021 04:50 AM2021-01-08T04:50:19+5:302021-01-08T04:50:19+5:30

महिलेला वाचविले जळगाव : पहुर येथील एक अत्यवस्थ महिलेवर शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालयात एक दुर्मीळ यशस्वी शस्त्रक्रीया करून ...

194 people were bitten by dogs | १९४ जणांना कुत्र्यांचा चावा

१९४ जणांना कुत्र्यांचा चावा

Next

महिलेला वाचविले

जळगाव : पहुर येथील एक अत्यवस्थ महिलेवर शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालयात एक दुर्मीळ यशस्वी शस्त्रक्रीया करून वाचविण्यात डॉक्टरांना यश आले आहे. महिलेच्या पोटात रक्त जमा झाले होते. गर्भ फुटल्याचे निदान डॉक्टरांनी केले होते. स्त्री रोग व प्रसुतीशास्त्र विभागप्रमुख डॉ. संजय बनसोडे यांनी तातडीने निर्णय घेऊन ही शस्त्रक्रीया केली आणि महिलेला वाचविण्यात डॉक्टरांच्या टीमला यश आले.

विद्यार्थांची तपासणी बारगळली

जळगाव : वाहनसेवाच उपलब्ध नसल्याने विद्यार्थी आरोग्य तपासणीसह अन्य अनेक राष्ट्रीय कार्यक्रमांवर सक्रांत आली असून ही वाहने सुरू करण्याची अधिकाऱ्यांनी मागणीही केलेली आहे. मात्र, वरिष्ठ पातळीवरून अद्याप निर्णयच झालेला नसल्याने महत्त्वाच्या योजना रखडल्या आहेत.

गंभीर रुग्ण घटले

जळगाव : कोरोनाच्या गंभीर रुग्णांमध्ये घट झाली असून ही संख्या १७ वर पोहोचली आहे. जिल्ह्यात कोरोनाचे १७ रुग्ण अतिदक्षता विभागात दाखल करण्यात आले आहेत. ही संख्या ४० पर्यंत पोहोचली होती. तर ४० रुग्णांना ऑक्सिजनचा पुरवठा करावा लागत आहे.

Web Title: 194 people were bitten by dogs

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.