दोन वाहनात कोंबलेल्या ३० गुरांची केली सुटका
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 27, 2020 12:00 PM2020-01-27T12:00:39+5:302020-01-27T12:00:56+5:30
नशिराबाद : वाहनात कोंबून नेत असलेले ३० गोºहे व बैलांची नशिराबाद पोलिसांनी सुटका केली. ही गुरे भुसावळहून जळगावकडे आणली ...
नशिराबाद : वाहनात कोंबून नेत असलेले ३० गोºहे व बैलांची नशिराबाद पोलिसांनी सुटका केली. ही गुरे भुसावळहून जळगावकडे आणली जात होती. यात वाहनचालकासह पाच जणांना अटक करण्यात आली आहे. तसेच दोन वाहने जप्त करण्यात आली आहेत. नशिराबाद महामार्गावर होमगार्ड प्रशिक्षण केंद्रासमोर शनिवार हा प्रकार घडला.
सुनिल शेनफड जगताप (४२, रा. शिवना, ता. सिल्लोड, जि. औरंगाबाद), शेख इम्रान शेख हनिफ (२४, रा. बोरगांव साखणी, ता. सिल्लोड), राजू गुलचंद बैताडे (२९, रा. अनवा पाडा, ता. भोकरदन, जि. जालना), शेख हमिद शेख माजिद (३०), शेख सलिम शेख कादिर (३० दोन्ही रा. सिल्लोड, जि. औरंगाबाद) अशी या अटक करण्यात आलेल्यांची नावे आहेत.
या गुरांना कुसूंबा येथील गोशाळेत हलविण्यात आले आहे. एम.एच.१९-पी.एल. ७७८६ व एम.एच. ०४ - ई.एल. ८०५७ या क्रमांकाच्या आयशर टेम्पो वाहनातून गुरे वाहतूक केली जात असल्याची गुप्त माहिती पोलिसांना मिळाली. त्यावरुन ही कारवाई करण्यात आली.
उडवाउडवीच उत्तरे
स्थानिक गुन्हा शाखेचे पोलीस निरक्षक बापू रोहम व नशिराबाद पोलीस ठाण्याचे सहाय्यक पोलीस निरीक्षक प्रविण साळुंके, पोकॉ.परेश महाजन, नारायण पाटील, रामचंद्र बोरसे, भगवान पाटील, दीपक शिंदे, दर्शन ढाकणे यांनी कारवाई केली. महामार्गावर ही वाहने थांबवून चौकशी केली. त्यात गुरे कोंबलेली आढळून आली.
पोलीसांनी कागद पत्रे चौकशी केली असता वाहन चालक व त्यांच्या साथीदारांनी उडवाउडवीची उत्तरे दिली. त्यात दोन्ही वाहनांसह १४ बैल व १६ गोºहे ताब्यात घेण्यात आली. त्याची किंमत २३ लाख रुपये आहे.
याबाबत पो.कॉ. परेश प्रकाश महाजन यांच्या फिर्यादीवरून नशिराबाद पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
सहाय्यक पोलीस निरीक्षक प्रविण साळुंके व सहकारी तपास करीत आहेत.
पोलिसांनी ही वाहने पकडली त्यावेळी महार्माावर एकच गर्दी झाली होती. त्यामुळे काही वेळ वाहतूक ठप्प झाली होती.