१ कोटी ७४ लाखांच्या सोलर दिव्यांची कामे थांबविली
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 11, 2020 12:29 PM2020-01-11T12:29:49+5:302020-01-11T12:30:16+5:30
जळगाव : निधी खर्च करण्यासंदर्भात असलेली मुदतवाढही संपुष्टात आल्याने जिल्हा परिषदेच्या समाज कल्याण विभागात येणाऱ्या १ कोटी ७४ लाखांच्या ...
जळगाव : निधी खर्च करण्यासंदर्भात असलेली मुदतवाढही संपुष्टात आल्याने जिल्हा परिषदेच्या समाज कल्याण विभागात येणाऱ्या १ कोटी ७४ लाखांच्या सोलर दिव्यांची निविदा प्रक्रिया रद्द करण्यात आली आहे. शिवसेना सदस्य नानाभाऊ महाजन यांनी यासंदर्भात निवेदन दिले होते़
जि़ प़ च्या समाजकल्याण विभागातून २०१८-२०१९ या वषार्साठी १ कोटी ७३ लाख रुपयांच्या निधीतून २२६ सोलर दिवे बसविण्याच्या कामांना ३ जानेवारी रोजी सीईओ डॉ़ बी़ एऩ पाटील यांनी प्रशासकीय मान्यता दिलेली होती़ ही कामे सेस फंडातून होणार असल्याने हा निधी २०१८-२०१९ या वित्तीय वर्षात खर्च करणे अपेक्षित होते, मात्र तेव्हा निधी खर्च न झाल्याने सप्टेंबर २०१९ पर्यंत मुदतवाढ देण्यात आली होती़ मात्र हा कालावधीही उलटून नंतर निविदा प्रक्रिया राबविली जात होती़ मात्र मिळालेली मुदवाढही संपल्याने ही कामे मंजूर झाल्यास जिल्हा परिषदेच्या अधिनियमांचे उल्लंघन होईल, तसेच आर्थिक अनियमितता वाढेल त्यामुळे ही कामे रद्द करावी व या कामांची ईटेंडर प्रक्रिया थांबवावी अशी मागणी सदस्य महाजन यांनी केली होती़ यावर सीईओंनी ही कामे थांबविली आहेत़