2 कोटींच्या प्लेट चोरीचे ‘जळगाव कनेक्शन’
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 22, 2017 12:33 AM2017-01-22T00:33:44+5:302017-01-22T00:33:44+5:30
जळगाव : मध्यप्रदेशातून चोरलेल्या दोन कोटी रुपयांच्या तांब्याच्या प्लेटचे जळगाव कनेक्शन असल्याचे उघड झाले आहे.
जळगाव : मध्यप्रदेशातून चोरलेल्या दोन कोटी रुपयांच्या तांब्याच्या प्लेटचे जळगाव कनेक्शन असल्याचे उघड झाले आहे. या गुन्ह्याच्या तपासासाठी मालेगाव पोलिसांचे एक पथक शनिवारी जळगावात दाखल झाले. सेवानिवृत्त पोलीस कर्मचा:याच्या मुलाचा यात सहभाग असल्याचे आढळून आल्याने पथकाने त्याला ताब्यात घेतले आहे तर एक जण फरार होण्यात यशस्वी झाला आहे.
मध्यप्रदेशातून चोरी झालेल्या या प्लेटचे कनेक्शन धुळे व मालेगाव असे आढळून आले होते. याप्रकरणी धुळे आझाद नगर पोलीस स्टेशनलाही गुन्हा दाखल झालेला आहे. तर मालेगावच्या दोन जणांना पोलिसांनी अटक केली. या प्लेटचा साठा मालेगावात आढळून आला. त्यातील 17 लाख रुपये किमतीच्या प्लेट शनिवारी जळगावात आणल्या जात असतानाच मालेगाव पोलिसांनी ट्रकसह एकाला ताब्यात घेतले. या प्लेट कुठे व कोणाकडे जात होत्या याची चौकशी केली असता त्यात जळगावच्या दोन जणांचे नाव समोर आले. मालेगावचे उपनिरीक्षक एन.जे.खैरनार यांचे पथक या चोरटय़ाला घेवून जळगावात आले असता त्यात एका निवृत्त पोलिसाच्या मुलाचे नाव पुढे आले. त्याला पोलिसांनी ताब्यात घेतले आहे. दरम्यान, चोरीच्या गाडय़ा आणून त्याची भंगारात विल्हेवाट लावण्याच्या प्रकरणातही या मुलाचे नाव पुढे आले होते.