२ लाख ९३ हजाराच्या जुन्या नोटा पकडल्या
By admin | Published: March 5, 2017 12:00 AM2017-03-05T00:00:17+5:302017-03-05T00:00:17+5:30
जळगाव : रथ चौकात राहणाºया योगेश मोरे या तरुणाकडे शनी पेठ पोलिसांनी शुक्रवारी चलनातून बाद झालेल्या २ लाख ९३ हजार ५०० रुपयाच्या नोटा पकडल्या आहेत.
जळगाव : रथ चौकात राहणाºया योगेश मोरे या तरुणाकडे शनी पेठ पोलिसांनी शुक्रवारी चलनातून बाद झालेल्या २ लाख ९३ हजार ५०० रुपयाच्या नोटा पकडल्या आहेत. या सर्व नोटा ५०० व १ हजार रुपयांच्या असून पोलिसांनी त्या जप्त केल्या आहेत. नाशिक येथील आयकर विभागाला या नोटांबाबत माहिती कळविण्यात आली आहे.
योगेश मोरे या तरुणाकडे बाद झालेल्या नोटा असून तो बदल करण्यासाठी घेवून जात असल्याची माहिती शनी पेठ पोलीस स्टेशनचे सहायक निरीक्षक सचिन बेंद्रे यांना मिळाली होती. त्यानुसार बेंद्रे, विनोद मराठे व नरेंद्र ठाकरे यांनी त्याला शुक्रवारी जोशी पेठेत अडविले. त्याची चौकशी केली असता उडवाउडवीची उत्तरे दिल्याने संशय अधिक बळावला. सखोल चौकशी केली असता त्याने या नोटा बांधकामासाठी राखून ठेवल्या होत्या व मुदतीच्या कालावधीत त्या बदल करता आल्या नाहीत. ३१ मार्चपर्यंत रिझर्व्ह बॅँकेकडे या नोटा बदल करता येवू शकणार असल्याने त्याची तयारी सुरु केल्याची माहिती पोलिसांना दिली.
दरम्यान, पोलिसांनी नोटा जप्त केल्या करुन स्टेशन डायरीला नोंद घेतली आहे, पुढील कारवाई आयकर विभाग करणार असल्याचे पोलीस निरीक्षक आत्माराम प्रधान यांनी सांगीतले.