जळगाव रेल्वे स्टेशनवर 2 महिन्यात लिफ्ट सुविधा

By Admin | Published: May 28, 2017 10:29 AM2017-05-28T10:29:30+5:302017-05-28T10:29:30+5:30

काम अंतिम टप्प्यात : प्रवाशांची गैरसोय दूर होणार; नवीन फलाटांचेही काम सुरु

2 month lift facility at Jalgaon railway station | जळगाव रेल्वे स्टेशनवर 2 महिन्यात लिफ्ट सुविधा

जळगाव रेल्वे स्टेशनवर 2 महिन्यात लिफ्ट सुविधा

googlenewsNext
>ऑनलाईन लोकमत
जळगाव,दि.28- रेल्वे स्थानकावर चार महिन्यांपासून सुरु असलेल्या दोन  लिफ्ट उभारणीचे काम  अंतिम टप्प्यात आहे. पुढील दोन महिन्यात काम पूर्ण होऊन लिफ्ट लोकार्पणासाठी सज्ज होणार आहेत़
जिल्ह्याचे ठिकाण व भुसावळ जंक्शन हे जवळच असल्याने स्थानकावर अनेक गाडय़ांना थांबा आह़े त्यामुळे मोठय़ा प्रमाणावर प्रवाशांची गर्दी होत असते, त्या अपंग प्रवाशांची संख्याही खूप आहे. प्रवाशांच्या सोयीसाठी लिफ्टचे काम हाती घेण्यात आले आहे. रेल्वेस्थानकाबाहेर एक लिफ्ट उभारण्यात आली आह़े या लिफ्टचे फलाटाला जोडण्यापासून बांधकाम तसेच रंगरंगोटीचे काम पूर्ण झाले आह़े  केवळ वीजजोडणीचे काम बाकी आह़े
इमारत बांधकाम पूर्ण
फलाट क्रमांक 1 व 2 वर एक लिफ्ट उभारण्याचे काम सुरू आह़े  फलाटाला जोडणी, लिफ्ट बसविणे, वीज जोडणी आदी कामे अपूर्ण आहेत़ रेल्वे विभागातर्फे स्थानकावर नवीन फलाट क्रमांक 5 व 6 चे काम सुरू असल्याने रेल्वेस्थानकावरील तिस:या लिफ्टच्या कामाला उशीर होणार आह़े 
एका वेळी 13 जणांची सोय
लिफ्टच्या कामासाठी ई निविदा प्रक्रिया राबविण्यात आली होती़ त्यानुसार बांधकामासह लिफ्ट बसविणे आदी कामे नाशिक येथील मक्तेदाराकडून करण्यात येत आह़े  विद्युतीकरणाचा मक्ता दुस:या मक्तेदाराला मिळाला आह़े लिफ्टमध्ये एकावेळी 13 जणांना ने-आण करता येणार आह़े 

Web Title: 2 month lift facility at Jalgaon railway station

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.