स्वामिनारायण संप्रदायाचे १५० संत आज अमळनेरात
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 12, 2019 06:27 PM2019-11-12T18:27:31+5:302019-11-12T18:28:48+5:30
भाविकांचे श्रद्धास्थान श्री स्वामिनारायण मंदिरात बीएपीएस संप्रदायाचे तीनशे संत दोन टप्प्यात येत आहेत.
अमळनेर, जि.जळगाव : येथील भाविकांचे श्रद्धास्थान श्री स्वामिनारायण मंदिरात बीएपीएस संप्रदायाचे तीनशे संत दोन टप्प्यात येत आहेत. त्यात प्रथम टप्प्यात १३ रोजी अकरा वाजता १५० संतांचे आगमन होत असून, त्यामध्ये सनातनी हिंदू धर्मात ब्रह्मचर्य व्रताचे पालन कसे केले जाते त्याचे जिवंत उदाहरण म्हणजे स्वामिनारायण संप्रदायात दाखल झालेले देश विदेशातून आलेले संत होय.
आई-वडिलांची एकुलती एक मुले २०, दोन भाऊ आहेत असे साधू दोन, अमेरिकेतून साधू बनण्यासाठी आलेले २०, मास्टर डिग्रीधारक साधू २०, इंजिनियर्स झालेले साधू ४०, एमबीए झालेले साधू ४, पदवीधर साधू ४४ असे एकूण पहिल्या टप्प्यात १५० साधू बुधवारी येत असल्याने सर्व स्वामिनारायण ट्रस्ट तयारीला लागले आहेत.
दुसऱ्या टप्प्यात स्वामिनारायण संप्रदायाचे १५० संंत येणार आहेत. अकराशे गुण अधिक संत स्वामिनारायण भगवान अक्षरब्रह्मगुणातीनंद स्वामी, भगतजी महाराज, शास्त्रीजी महाराज, योगीजी महाराज, प्रमुखस्वामी महाराज व वर्तमान काळी ब्रह्मस्वरूप, परमपूज्य महंतस्वामी महाराजांचे आज्ञेत राहून सेवा देत आहे. ‘संत येती अमळनेरात तोचि दिवाळी दसरा’ या उक्तीप्रमाणे संतांच्या दर्शनाचा भाविकांनी लाभ घ्यावा, असे आवाहन खान्देशाचे केदारी संत पूज्य आनंदजीवन स्वामी, योगीस्नेह स्वामी, पूज्य अखंडमुनी स्वामी व अमळनेर सत्संग मंडळाने केले आहे.