2 हजारावर मंडळाकडून होणार ‘श्री’ ची स्थापना
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 18, 2017 05:40 PM2017-08-18T17:40:30+5:302017-08-18T17:49:20+5:30
जळगाव जिल्ह्यात गणरायाच्या स्वागतासाठी मंडळे सज्ज झाली आहेत
ऑनलाईन लोकमत जळगाव, दि. 18 : यंदा जिल्ह्यातील दोन हजारावर मंडळाकडून ‘श्री’ ची स्थापना होण्याचे संकेत असून 100 गावात ‘एक गाव एक गणपती’ हा उपक्रम राबविण्यात येणार आहे. गेल्यावर्षी 98 गावात हा उपक्रम राबविण्यात आला होता. यंदा ही संख्या शंभरावर नेण्यासाठी पोलीस प्रशासनाने प्रय} केले. दीड हजार ठिकाणी सार्वजनिक तर 500 च्यावर ठिकाणी खासगी मंडळातर्फे गणेशोत्सव साजरा केला जाणार आहे. दरम्यान, पोलीस महासंचालक सतीश माथूर यांनी गेल्या आठवडय़ात पोलीस अधीक्षक दत्तात्रय कराळे यांच्याकडून गणेशोत्सवाच्या तयारीचा आढावा घेतला होता. विशेष महानिरीक्षक व्ही.के.चौबे यांनीही प्रत्यक्ष भेटीत काही सूचना केल्या आहेत. दरम्यान, गणेश मंडळांनी नेमलेले स्वयंसेवक व पोलीस मित्रांची बंदोबस्तकामी मदत घेतली जाणार आहे. त्यांना बीडीडीएसकडून सुरक्षेच्यासंदर्भात प्रशिक्षण दिले जाणार आहे. गर्दीच्या ठिकाणी बॉम्बसदृष्य वस्तू अथवा बेवारस वस्तू आढळून आली तर काय खबरदारी घ्यावी यावर या शाखेचे प्रमुख उपनिरीक्षक ईश्वर सोनवणे व त्यांचे सहकारी मार्गदर्शन करीत आहेत. दरम्यान,गणेशोत्सव निर्विघAपणे पार पडावा यासाठी पोलीस प्रशासनाने जय्यत तयारी केली आहे.