अवैध दारूचे १९ दिवसात २० गुन्हे
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 20, 2021 04:16 AM2021-04-20T04:16:28+5:302021-04-20T04:16:28+5:30
लोकमत न्यूज नेटवर्क जळगाव : लाॅकडाऊन काळात अवैध मद्यविक्री करणाऱ्यांविरोधात राज्य उत्पादन शुल्क विभागाने मोहीम राबवून १९ दिवसात २० ...
लोकमत न्यूज नेटवर्क
जळगाव : लाॅकडाऊन काळात अवैध मद्यविक्री करणाऱ्यांविरोधात राज्य उत्पादन शुल्क विभागाने मोहीम राबवून १९ दिवसात २० गुन्हे दाखल केले असून १० जणांना अटक केली आहे.
कोरोनाचा वाढता संसर्ग लक्षात घेता प्रशासनाने काही कडक निर्बंध लागू केले आहेत. त्यात सद्यस्थितीत लाॅकडाऊन लागू झालेला आहे.या काळात मद्य विक्रीचे दुकाने बंद असल्याने देशी, विदेशी व गावठी मद्याची अवैध विक्री मोठ्या प्रमाणावर होण्याची शक्यता लक्षात घेता राज्य उत्पादन शुल्क विभागाच्या भरारी पथकाचे निरीक्षक चंद्रकांत पाटील यांनी विशेष मोहीम हाती घेतली. १ ते २९ एप्रिल या १९ दिवसात जिल्ह्यात अवैध दारू विक्री करणाऱ्या दहा जणांना अटक केली तर २० जणांविरुद्ध गुन्हे दाखल केलेला आहे. यात दोन दुचाकीसह २ लाख २१ हजार रुपयांचा मुद्देमाल या पथकाने जप्त केलेला आहे.
दोन परवाना धारकांवर कारवाई
कोरोनाच्या पार्श्वभूमीवर जिल्हाधिकाऱ्यांनी घालून दिलेल्या निर्बंधाचे उल्लंघन केल्याप्रकरणी चाळीसगाव व पारोळा येथे परवानाधारक मध्ये विक्रेत्यांवर कारवाई करण्यात आलेली आहे. या कारवाईचा अहवाल जिल्हाधिकाऱ्यांकडे सादर करण्यात आला असून दंडात्मक किंवा इतर कोणती कारवाई करायची याचा निर्णय जिल्हाधिकारीच घेतील, अशी माहिती निरीक्षक चंद्रकांत पाटील यांनी दिली.
अशी आहे कारवाई
एकूण गुन्हे : २०
अटक आरोपी : १०
जप्त मुद्देमाल : २, २१,०००
वाहन जप्त : २