जिल्हा बॅँकेचे 210 कोटी बदलाचा मार्ग मोकळा
By admin | Published: June 22, 2017 11:55 AM2017-06-22T11:55:43+5:302017-06-22T11:55:43+5:30
शासन निर्णयाने दिलासा : बँकेकडे पडून होती रकम
Next
ऑनलाईन लोकमत
जळगाव,दि.22 - नोट बंदीच्या काळात जिल्हा बॅँकेने स्विकारलेल्या जुन्या नोटांचे 210 कोटी रुपयांची रकम बदलाचा मार्ग केंद्र शासनाने घेतलेल्या निर्णयामुळे मोकळा झाला आहे.
केंद्र शासनाने नोव्हेंबर 2016 मध्ये 500 व एक हजाराच्या रकमांवर बंदी आणली होती. मात्र या नोटा काही कालावधीर्पयत स्विकारण्यास बॅँकांना परवानगी देण्यात आली होती. शासन निर्णया नुसार जिल्हा बॅँकेने आपल्या जिल्हाभरातील 250 शाखांच्या माध्यमातून 10 ते 14 नोव्हेंबर या कालावधित ग्रामीण भागातून 500 व एक हजाराच्या नोटा स्विकारल्या होत्या. स्विकारलेल्या या नोटांची रकम सुमारे 210 कोटी एवढी होती.
शासन निर्णयाचे स्वागत
मात्र सततच्या पाठपुराव्यानंतर केंद्राच्या वित्त मंत्रालयाने जिल्हा बॅँकांकडे पडून असलेल्या या नोटा स्विकारण्याचा निर्णय घेतला आहे. या संदर्भातील केंद्राचे राजपत्र प्राप्त झाल्याने बॅँकेच्या संचालक वर्गात समाधान व्यक्त केले जात आहे. 30 जून नंतर या संदर्भातील अधिसूचना प्राप्त होणार असून नोटा परत घेण्याबाबतचे निर्देश व कार्यप्रणालीची त्यात माहिती मिळणार आहे. जुलैच्या पहिल्या आठवडय़ात नोटा परतीचा हा व्यवहार पूर्ण होण्याचे संकेत आहेत.