जळगाव जिल्ह्यात २०० तीव्र कुपोषित बालक

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 21, 2019 01:08 PM2019-06-21T13:08:54+5:302019-06-21T13:09:23+5:30

जामनेर तालुक्यात सर्वाधिक तीव्र कुपोषित बालक

200 acute malnourished children in Jalgaon district | जळगाव जिल्ह्यात २०० तीव्र कुपोषित बालक

जळगाव जिल्ह्यात २०० तीव्र कुपोषित बालक

Next

जळगाव : जिल्ह्यात केवळ तीव्र कुपोषित बालकांना सकस आहार दिला जात असून मध्यम कुपोषित बालक त्यापासून वंचित राहत आहे. असे असले तरी जिल्ह्यात कुपोषित बालकांची संख्या कमी झाली असल्याची बाब आकडेवारीवरून समोर आली आहे. जिल्ह्यात एकूण १ हजार ७१५ कुपोषित बालके असून त्यापैकी २०० बालके तीव्र कुपोषित आहेत. यामध्ये जामनेर तालुक्यात ही संख्या सर्वाधिक (३२ बालके) असून पारोळा तालुक्यात सर्वात कमी (२ बालके) आहे.
माजी मंत्री एकनाथराव खडसे यांनी बुधवारी विधानभवनात कुपोषणाचा मुद्दा उपस्थित करीत राज्यात युती सरकारच्याच काळात कुपोषणाची तीव्रता वाढल्याचा आरोप करीत सरकारला घरचा आहेर दिला. खडसे यांच्या या आरोपानंतर जिल्ह्यातील कुपोषणाच्या स्थितीचा आढावा घेतला असता गेल्या वर्षाच्या तुलनेत हा आकडा निम्म्यावर आला असल्याचे समोर आले.
जानेवारी २०१९ ते मे २०१९ या काळात जिल्ह्यात २०० तीव्र कुपोषित बालके आढळून आली. गेल्या वर्षी याच काळात ही संंख्या ४००च्यावर होती. ती या वेळी निम्म्यावर आली आहे. या सोबतच जिल्ह्यात मध्यम कुपोषित बालकांची संख्या एक हजार ५१५ असल्याची माहिती महिला व बालकल्याण विभागाचे उप मुख्य कार्यकारी अधिकारी आर.आर. तडवी यांनी दिली.
जिल्ह्यात सर्वाधिक तीव्र कुपोषित बालके जामनेर तालुक्यात असून तेथे ही संख्या ३२ आहे. त्या खालोखाल चोपडा तालुक्यात २८ तर चाळीसगाव तालुक्यात १९ तीव्र कुपोषित बालके आहेत. पारोळा तालुक्यात सर्वात कमी म्हणजेच दोन कुपोषित बालके आढळून आली.

तालुकानिहाय तीव्र कुपोषित बालके
जळगाव - १३
जामनेर - ३२
मुक्ताईनगर - १८
पाचोरा - ६
पारोळा - २
रावेर - १३
यावल - ६
अमळनेर - १७
बोदवड - १५
चाळीसगाव - १९
चोपडा - २८
धरणगाव - १७
एरंडोल - १४
एकूण - २००

Web Title: 200 acute malnourished children in Jalgaon district

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.

टॅग्स :Jalgaonजळगाव