200 रुपयांची नोट लवकरच चलनात
By Admin | Published: April 5, 2017 01:13 PM2017-04-05T13:13:00+5:302017-04-05T13:13:00+5:30
रिझव्र्ह बँकेकडून लवकरच 200 रुपयांची नोट चलनात येणार असल्याची माहिती नंदुरबार जिल्हा अग्रणी बँकेचे व्यवस्थापक महेश प्रभू यांनी सांगितले.
>नंदुरबार,दि.5- रिझव्र्ह बँकेकडून लवकरच 200 रुपयांची नोट चलनात आणली जाणार आहे. काही दिवसात या नोटेची छपाई सुरु होऊन महिनाभरात ही नोट चलणात येणार असल्याची माहिती नंदुरबार जिल्हा अग्रणी बँकेचे व्यवस्थापक महेश प्रभू यांनी ‘लोकमत’शी बोलतांना सांगितले.
नंदुरबार शहरासह तळोदा, शहादा, अक्कलकुवा आणि धडगाव शहर व तालुक्याच्या विविध भागात 10 रूपयांची नाणी स्विकारली जात नसल्याच्या तक्रारी गेल्या चार दिवसात सातत्याने वाढल्या आहेत़
10 रुपयांच्या नाण्याबाबत कोणतेही आदेश नाही
रिझव्र्ह बँकेने 10 रूपयांच्या नाण्यांना बंदीचे कोणतेही आदेश काढलेले नसताना अचानक सुरू झालेल्या या प्रकारामुळे नागरिक हैराण झाले आहेत़ हे प्रकार थांबवण्याची गरज असताना बँकांकडून ठोस प्रकारच्या कोणत्याही उपाययोजना होत नसल्याने नाराजी व्यक्त करण्यात येत आह़े ग्रामीण भागातून येणा:यांना बसमध्ये किंवा इतर ठिकाणी मिळालेले 10 रूपयांचे नाणे खर्च करण्यासाठी किरकोळ व्यावसायिकाकडे गेल्यास ते नाणे घेण्यास थेट नकार कळवत आहेत़
बँकांकडून जनजागृती आवश्यक
मोठे व्यावसायिकही हे नाणे स्विकारत नसल्याचे प्रकार शहरी भागात दिसून येत आह़े चलनात असलेले नाणे व्यवहारातून काढून टाकण्याच्या या प्रकारांमुळे नागरिकांची सर्वाधिक परवड होत असल्याने बँकांनी जनजागृती करण्याची गरज असल्याचे मत जिल्ह्यातून व्यक्त होत आह़े
दहा रुपयाचे नाणे चलणात कायम- महेश प्रभू
10 रूपयांच्या नाण्यांना चलनातून काढण्याचे कोणतेही आदेश रिझव्र्ह बँकेचे नाहीत़ नंदुरबार जिल्ह्यात सुरू झालेला हा प्रकार खोडसाळपणा आह़े बँकांनी आपपल्या ग्राहकांना आणि व्यापा:यांना याबाबत समज द्यावी, 10 रूपयांचे नाणे हे चलनाचा अविभाज्य भाग असल्याचे नंदुरबार जिल्हा अग्रणी बँकेचे व्यवस्थापक महेश प्रभू यांनी ‘लोकमत’सोबत बोलताना दिली़
200 रुपयांची नोट लवकरच
देशात लवकरच 200 रूपयांच्या नव्या नोटा येणार असल्याची माहिती त्यांनी दिली़ या नोटांची छपाई महिनाभरात पूर्ण झाल्यास त्या येत्या महिन्यात चलनात येतील असेही प्रभू म्हणाल़े