कोसळलेला मंडप उभारणीसाठी २०० स्वयंसेवक भिडले
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 16, 2019 04:32 PM2019-04-16T16:32:29+5:302019-04-16T16:32:36+5:30
कार्यक्रम ठरल्याप्रमाणेच होणार : संत सखाराम महाराज समाधी द्विशताब्दी सोहळा
लोकमत न्यूज नेटवर्क
अमळनेर : सद्गुरु संत सखाराम महाराज मंदिर संस्थानच्या द्विशताब्दी सोहळ्याचे नियोजित कार्यक्रम ठरलेल्या मंडपांमध्ये व्हावेत यासाठी संत सखाराम महाराजांचे महाराष्ट्रातील सुमारे २०० हून अधिक शिष्यगण, स्वयंसेवक दिवस रात्र मंडपे उभारणीचे काम करीत आहेत.
गेल्या पंधरा दिवसांपासून मंडप बांधण्याचे कार्य सुरू होते. मात्र परवा झालेल्या वादळात मंडपाचा सांगाडा जमिनदोस्त झाला. त्यामुळे े मंडप पुन्हा उभारणीसाठी हे स्वयंसेवक स्वयंस्फूर्तीने कामाला लागले आहेत. संस्थानचे विद्यमान गादीपती संत प्रसाद महाराज यांनीही या स्वयंसेवकांचा उत्साह वाढविला आहे.
यंदा संत सखाराम महाराज संस्थानच्या समाधीचे हे द्विशताब्दी वर्ष असून २१ ते २९ एप्रिल दरम्यान होणाऱ्या या सोहळ्यासाठी समाधी स्थळ मंदिरासमोर बोरी नदीच्या वाळवंटात विस्तीर्ण असे मंडप उभारले जात होते. दोन दिवसांपूर्वी आलेल्या वारा वादळातमंडपासाठी बांधलेले बांबू जमिनदोस्त झाले. विविध कार्यक्रम याच मंडपांमध्ये होणार होते आलेल्या या परिस्थितीवर मात करण्यासाठी अमळनेर, जळगाव, नाशिक, धुळे, औरंगाबाद महाराष्ट्रातील काना कोपºयातून संत सखाराम महाराजांचा शिष्यगण अमळनेर येथे स्वयंसेवक म्हणून काम करण्यासाठी आलेले आहेत. सुमारे दोनशे स्वयंसेवक मिळेल ते काम करीत आहेत.