नशिराबादच्या बारागाडय़ांना 200 वर्षाची परंपरा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 10, 2017 11:09 AM2017-04-10T11:09:38+5:302017-04-10T11:09:38+5:30

गेल्या दोन शतकांची अखंड परंपरा असलेल्या श्री खंडेराव महाराज यांच्या यात्रोत्सवास 10 एप्रिलपासून प्रारंभ होत आहे.

200 Years Tradition to Barabadas of Nashikabad | नशिराबादच्या बारागाडय़ांना 200 वर्षाची परंपरा

नशिराबादच्या बारागाडय़ांना 200 वर्षाची परंपरा

Next

 ऑनलाईन लोकमत/प्रसाद धर्माधिकारी  

नशिराबाद, दि.10- गेल्या दोन शतकांची अखंड परंपरा असलेल्या श्री खंडेराव महाराज यांच्या यात्रोत्सवास 10 एप्रिलपासून प्रारंभ होत आहे. चार दिवस चालणा:या या उत्सवात बारागाडय़ा ओढणे, कठडे मिरवणूक, लोकनाटय़ आदी कार्यक्रमाचे आयोजन केले आहे. 12 एप्रिल रोजी सायंकाळी बारागाडय़ा ओढण्याचा कार्यक्रम होईल.
सुनसगाव रस्त्यालगत श्री खंडेराव महाराज यांचे पुरातन मंदिर आहे. यात्रोत्सव निमित्त दरवर्षी विविध कार्यक्रम घेण्यात येतात. यंदा 10 एप्रिल सकाळी 8 वाजता श्रींच्या मूर्तीस पंचामृत महाभिषेक पूजन करून यात्रोत्सवास प्रारंभ झाला. 11 रोजी सकाळी 8 वाजता पारंपरिक पूजन व दुपारी 4 वाजता सत्यनारायण पूजन होईल. चैत्र वद्य प्रतिपदेला अर्थात 12 रोजी पहाटे श्रींची पूजा सायंकाळी 5 वाजता भगत सुदाम दामू धोबी यांच्या हस्ते बारागाडय़ा ओढण्याचा कार्यक्रम होईल. सायंकाळी 7 वाजता कठडे मिरवणूक निघणार आहे. त्यानंतर रात्री 8 वाजता चंदाबाई रावेरकर यांचा लोकनाटय़ाचा कार्यक्रम होईल. 13 रोजी सकाळी श्रींच्या मूर्तीस महापूजन अभिषेक व रात्री 8 वाजता लोकनाटय़ाचा कार्यक्रम होईल. 
 
दोनशे वर्षापासून धोबी घराण्याकडे बारागाडय़ा ओढण्याचा मान
चैत्र वद्य प्रतिपदेला खंडेराव महाराज यात्रोत्सवनिमित्त बारागाडय़ा ओढण्याची परंपरा आहे. नशिराबाद येथील धोबी घराण्याकडे सुमारे दोनशे वर्षापासून बारागाडय़ा ओढण्याची प्रथा आजही सुरूच आहे. पिढय़ान्-पिढय़ा बारागाडय़ा ओढण्याची परंपरा  धोबी घराण्याने सांभाळलेली आहे. दामू शंकर धोबी यांनी वयाची 82 वर्षे ओलांडली तरी त्यांचे मार्गदर्शन मिळत आहे. ते एकेकाळी नामांकित पहेलवान होते. त्यांनी सलग 35 वर्षे बारागाडय़ा ओढल्या. त्यांच्या आधीही कित्येक पिढय़ानपासून बारागाडय़ा ओढण्याची प्रथा आहे. गेल्या दीड वर्षापूर्वी मोतीलाल संपत धोबी (गोमा धोबी) यांचे निधन झाले. त्यामुळे आता माजी ग्रामपंचायत सदस्य सुधाकर उर्फ सुदाम धोबी यांनी ही धुरा सांभाळली आहे. यंदा बारागाडय़ा ओढण्याचे त्यांचे दुसरे वर्ष आहे. येथील बारागाडय़ा व खंडेराव महाराज यात्रोत्सवाला अनन्य महत्त्व आहे.
 
उत्सव समिती
खंडेराव महाराज यात्रोत्सवाचे अध्यक्ष योगेश पाटील, उपाध्यक्षपदी जिल्हा परिषद सदस्य लालचंद पाटील यांची निवड झाली. खजिनदार ज्ञानदेव लोखंडे, सचिव मोहन येवले, सेक्रेटरी किशोर पाटील आहेत. सरपंच खिलचंद रोटे प्रेरणास्थान असून भरत बोंडे, किरण पाटील आदींचे सहकार्य आहे. गावातील गणेश मंडळ, दुर्गोत्सव मंडळाचे कार्यकर्ते, ग्रामस्थ यात्रोत्सवासाठी परिश्रम घेत आहे.

Web Title: 200 Years Tradition to Barabadas of Nashikabad

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.