यंदाच्या पावसाळ्यात लावले जाणार २००० वृक्ष
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 28, 2021 04:13 AM2021-06-28T04:13:31+5:302021-06-28T04:13:31+5:30
जळगाव : रोटरी परिवार व वन विभाग यांच्या संयुक्त विद्यमाने २००० वृक्ष लागवडीचा संकल्प करण्यात आला असून यामध्ये १२१ ...
जळगाव : रोटरी परिवार व वन विभाग यांच्या संयुक्त विद्यमाने २००० वृक्ष लागवडीचा संकल्प करण्यात आला असून यामध्ये १२१ वृक्षांची कुंभारखोरे येथे लागवड करण्यात आली. या पावसाळयात हे २००० वृक्ष लावले जाणार आहेत.
पर्यावरण संवर्धनासाठी वृक्ष लागवड करण्याचा निर्णय रोटरी परिवाराने घेतला असून यामध्ये रोटरी व वन विभागातर्फे हा उपक्रम राबविला जाणार आहे. यामध्ये कुंभारखोरे येथे याचा शुभारंभ करण्यात येऊन १२१ झाडे लावण्यात आली. या वेळी उपवनसंरक्षक विवेक होशिंग, वन परिक्षेत्र अधिकारी समाधान पाटील, रोटरीचे एन्ल्क्यू चेअरमन संगीता पाटील, असिस्टंट गव्हर्नर डॉ. अपर्णा मकासरे, योगेश भोळे, भावेश शहा, धनराज कासट, अपर्णा भट, डॉ. अग्रवाल, प्रोजेक्ट चेअरमन वर्धमान भंडारी, रजनीश लाहोटी, बालेश कोतवाल, दिनेश कक्कड, नूतन कक्कड, रोटरी परिवारातील सदस्य यांच्यासह पाच वर्षांच्या लहान मुलापासून ते ७५ वर्षांच्या वृद्धापर्यंत उपस्थित होते.
उपस्थित प्रत्येकाने एक-एक झाड लावून त्याचे संगोपन करण्याचा निश्चय केला. त्यामुळे कुंभारखोरे एक ऑक्सिजन हब बनेल, असा विश्वास व्यक्त करण्यात आला.
फोटो कॅप्शन - वृक्षारोपण करताना विवेक होशिंग, वर्धमान भंडारी. सोबत संगीता पाटील, डॉ. अपर्णा मकासरे, योगेश भोळे, धनराज कासट, रजनीश लाहोटी व अन्य.