जिल्ह्यातील ५ नद्यांवर २१ बंधारे

By admin | Published: March 4, 2017 12:55 AM2017-03-04T00:55:23+5:302017-03-04T00:55:23+5:30

नदी पुनरुज्जीवन प्रस्तावास मान्यता : ७ कोटी १३ लाखांचा निधीही मंजूर

21 dams on 5 rivers in the district | जिल्ह्यातील ५ नद्यांवर २१ बंधारे

जिल्ह्यातील ५ नद्यांवर २१ बंधारे

Next

जळगाव : जिल्ह्यातील पाच नद्यांच्या पुनरुज्जीवन प्रस्तावास शासनाच्या ग्रामविकास व जलसंधारण विभागाने तत्त्वत: मान्यता दिली असून त्यासाठी ७ कोटी १३ लाख रुपयांचा निधीही मंजूर केला आहे. यामध्ये रावेर, चोपडा व पाचोरा या तीन तालुक्यांमध्ये २१ बंधारे उभारले जाणार असल्याची  माहिती जिल्हाधिकारी रुबल अग्रवाल यांनी दिली.
यासंदर्भात जिल्हाधिकाºयांना ग्रामविकास विभाग व जलसंधारण विभागाकडून पत्र प्राप्त झाले आहे. त्यानुसार जिल्ह्यातील नदी पुनरुज्जीवन कार्यक्रमांतर्गत पाच नद्यांवर २१ सिमेंट नाला बांध बांधून त्याद्वारे पाणी अडवून नदी पुनरुज्जीवन करण्यास मान्यता देण्यात आली आहे.
मागणी प्रस्ताव सादर करण्याचे निर्देश
या कामांबाबतचा सविस्तर प्रस्ताव सक्षम अधिकाºयांकडून दिलेल्या तांत्रिक मंजुरीसह व जिल्हाधिकाºयांनी दिलेल्या प्रशासकीय मान्यतेसह लघुसिंचन (जलसंधारण) विभागाच्या अधीक्षक अभियंत्यांनी सविस्तर निधीची मागणी करणारा प्रस्ताव शासनाकडे पाठवावा, असे निर्देशही देण्यात आले         आहेत.
तसेच या योजनेत संबंधित क्षेत्रात करावयाची नाला जलसंधारण उपचार व क्षेत्र जलसंधारण उपचाराची कामेही अंतर्भूत करावीत व प्रस्ताव तातडीने शासनाकडे पाठवावा, असे पत्र अवर सचिव यांच्या कार्यालयामार्फत जिल्हाधिकारी कार्यालयास प्राप्त झाल्याची माहितीही जिल्हाधिकारी अग्रवाल यांनी दिली.

या पाच नद्यांवर  होणार बंधारे
 रावेर तालुक्यातील बोकड नदीवर ८ बंधारे
 पाचोरा तालुक्यातील सोनद नदीवर ३
 उतावळी नदीवर ७
 हिवरा नदीवर एक
 चोपडा तालुक्यातील चंपावती नदीवर २ अशा एकूण २१ बंधाºयांच्या कामास मान्यता देण्यात आली आहे.

असा निधी झाला मंजूर
 बोकड नदीवरील बंधाºयांसाठी १ कोटी ८४ लाख ३३ हजार रुपये, सोनद नदीवरील बंधाºयांसाठी १ कोटी तीन लक्ष ५८ हजार रुपये, उतावळी नदीवरील बंधाºयांसाठी १ कोटी ८६ लाख ५ हजार रुपये, हिवरा नदीवरील बंधाºयासाठी ८५ लाख २ हजार रुपये तर चंपावती नदीवरील बंधाºयांसाठी १ कोटी ५३ लाख ४२ हजार रुपये असे एकूण ७ कोटी १३ लाख ३ हजार रुपयांचा निधीही मंजूर करण्यात आला आहे.

Web Title: 21 dams on 5 rivers in the district

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.