रावेर, चोपडा व पाचोरा तालुक्यातील नद्यांवर २१ बंधारे

By admin | Published: March 4, 2017 12:42 AM2017-03-04T00:42:57+5:302017-03-04T00:42:57+5:30

नदी पुनरुज्जीवन प्रस्तावास तत्त्वत: मान्यता : सात कोटी १३ लाख रुपयांचा निधी मंजूर

21 dams on rivers in Raver, Chopda and Pachora talukas | रावेर, चोपडा व पाचोरा तालुक्यातील नद्यांवर २१ बंधारे

रावेर, चोपडा व पाचोरा तालुक्यातील नद्यांवर २१ बंधारे

Next

जळगाव : जिल्ह्यातील पाच नद्यांच्या पुनरुज्जीवन प्रस्तावास शासनाच्या ग्रामविकास व जलसंधारण विभागाने तत्त्वत: मान्यता दिली असून त्यासाठी सात कोटी १३ लाख रुपयांचा निधीही मंजूर केला आहे. यामध्ये रावेर, चोपडा व पाचोरा या तीन तालुक्यांमध्ये २१ बंधारे उभारले जाणार असल्याची  माहिती जिल्हाधिकारी रुबल अग्रवाल यांनी दिली.
यासंदर्भात जिल्हाधिकाºयांना ग्रामविकास विभाग व जलसंधारण विभागाकडून पत्र प्राप्त झाले असून जिल्ह्यातील नदी पुनरुज्जीवन कार्यक्रमांतर्गत पाच नद्यांवर २१ सिमेंट नाला बांध बांधून त्याद्वारे पाणी अडवून नदी पुनरुज्जीवन करण्यास मान्यता देण्यात आली आहे.
 बोकड नदीवरील बंधाºयांसाठी १ कोटी ८४ लाख ३३ हजार रुपये, सोनद नदीवरील बंधाºयांसाठी १ कोटी तीन लक्ष ५८ हजार रुपये, उतावळी नदीवरील बंधाºयांसाठी १ कोटी ८६ लाख ५ हजार रुपये, हिवरा नदीवरील बंधाºयासाठी ८५ लाख २ हजार रुपये तर चंपावती नदीवरील बंधाºयांसाठी १ कोटी ५३ लाख ४२ हजार रुपये असे एकूण ७ कोटी १३ लाख ३ हजार रुपयांचा निधीही मंजूर करण्यात आला आहे. या कामांबाबतचा सविस्तर प्रस्ताव सक्षम अधिकाºयांकडून दिलेल्या तांत्रिक मंजुरीसह व जिल्हाधिकाºयांनी दिलेल्या प्रशासकीय मान्यतेसह लघुसिंचन ( जलसंधारण) विभागाच्या अधीक्षक अभियंत्यांनी सविस्तर निधी मागणी प्रस्ताव शासनाकडे पाठवावा, असे निर्देशही देण्यात आले आहेत. तसेच या योजनेत संबंधित क्षेत्रात करावयाची नाला जलसंधारण उपचार व क्षेत्र जलसंधारण उपचाराची कामेही अंतर्भूत करावीत व प्रस्ताव तातडीने शासनाकडे पाठवावा, असे पत्र अवर सचिव यांच्या कार्यालयामार्फत जिल्हाधिकारी कार्यालयास प्राप्त  झाल्याचे अग्रवाल म्हणाल्या़
यापाच नद्यांवर होणार बंधारे
४रावेर तालुक्यातील बोकड नदीवर ८ बंधारे
४पाचोरा तालुक्यातील सोनद नदीवर ३
४उतावळी नदीवर ७ ४हिवरा नदीवर एक
४चोपडा तालुक्यातील चंपावती नदीवर २ 

Web Title: 21 dams on rivers in Raver, Chopda and Pachora talukas

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.