एस.टी.बस व मालवाहू वाहनाच्या अपघातात २१ प्रवाशी जखमी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 4, 2019 11:47 PM2019-05-04T23:47:07+5:302019-05-04T23:48:40+5:30
एस.टी.बस व मालवाहू चारचाकीची समोरासमोर धडक होऊन त्यात बसमधील चालकासह २१ प्रवाशी जखमी झाल्याची घटना शनिवारी दुपारी ३ वाजता तालुक्यातील पाथरी गावापासून काही अंतरावर घडली.
जळगाव : एस.टी.बस व मालवाहू चारचाकीची समोरासमोर धडक होऊन त्यात बसमधील चालकासह २१ प्रवाशी जखमी झाल्याची घटना शनिवारी दुपारी ३ वाजता तालुक्यातील पाथरी गावापासून काही अंतरावर घडली.
जळगावकडून पाचोराकडे जाणाºया बसवर (क्र.एम एच १४ बीटी ०४१६) पाचोराकडून जळगावकडे जाणारी मालवाहू चारचाकी (क्र.एम.एच.१९ बीएम २७४९) बसवर आदळली. बसचालकाने प्रसंगवधान राखून बस खाली उतरवल्याने मोठा अपघात टळला. मालवाहू वाहनाचा चालक अपघात होताच पसार झाला. यामध्ये बस चालकाच्या पायाला गंभीर दुखापत झाली आहे. बसमध्ये महिला, लहान मुलांसह ४९ प्रवासी होते.
बस चालक नगराज दशरथ भागवत (५२, रा. गिरड, भडगाव) यांच्या दोन्ही पायाला दुखापत झाली आहे. रामदास राघो पाटील (७०, रा.पाचोरा), कलाबाई भिमसिंग महाले (५०, रा. नगरदेवळा), मनिषा सुभाष बडगुजर (३५ रा. कांचन नगर जळगाव) हे गंभीर जखमी झाले असून त्यांना पाचोरा ग्रामीण रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे.
किरकोळ जखमींमध्ये ज्योती संभाजी बाविस्कर (मानराज पार्क जळगाव), यश संभाजी बाविस्कर (मानराज पार्क जळगाव), जानकाबाई भगवानसिंग राजपूत(नागद, ता.पाचोरा), छाया प्रदीप राजपूत (नागद, ता.पाचोरा), मीराबाई शंकर राठोड, मीराबाई शंकर राठोड, शंकर नगराज राठोड(तळवंद तांडा ता भडगाव ), संगीता भागवत पाटील (मोहरद, ता चोपडा), तुकाराम सीताराम पाटील ,कोकिळा तुकाराम पाटील, (पिंपळगाव हरेश्वर, ता.पाचोरा),सुरेखा पाटील (रा.चाळीसगाव) शेहबाज शेख एनरुद्दीन पटेल, विकास किरण पाटील(माहिजी, ता.पाचोरा), यशवंत बाबुलाल पाटील (नगरदेवळा, ता.पाचोरा), इंदूबाई काशीनाथ कुंभार(पिंप्राळा), महादू तोताराम पाटील (रा. पथराड, ता. भडगाव) व वाहक संगीता किशोर सावळे (रा. पाचोरा) यांचा समावेश आहे.
घटनास्थळी पाथरी येथील विनोद अरुण पाटील, पोलीस पाटील संजीव लंगरे, गणेश बडगुजर यांनी जखमींना मदत करुन उपचारासाठी रवाना केले. घटनास्थळी म्हसावद दूरक्षेत्राचे महेंद्रसिंग पाटील, समाधान पाटील यांनी तातडीने धाव घेतली. चारचाकी चालकाचे नाव राजेश अर्जुनदास दाखनेजा (वय ४२, रा. सिंधी कॉलनी, पाचोरा) असल्याचे पोलीसांनी सांगितले.