पाच वर्षांत २,१४९ जणांचा रस्ता अपघातात मृत्यू

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 14, 2021 04:14 AM2021-01-14T04:14:01+5:302021-01-14T04:14:01+5:30

जळगाव : जिल्ह्यात २०१६ ते २०२० या पाच वर्षांत जळगाव जिल्ह्यात ३ हजार ५४६ अपघात घडले असून, त्यात २ ...

2,149 people killed in road accidents in five years | पाच वर्षांत २,१४९ जणांचा रस्ता अपघातात मृत्यू

पाच वर्षांत २,१४९ जणांचा रस्ता अपघातात मृत्यू

Next

जळगाव : जिल्ह्यात २०१६ ते २०२० या पाच वर्षांत जळगाव जिल्ह्यात ३ हजार ५४६ अपघात घडले असून, त्यात २ हार १४९ जणांचा मृत्यू झाला आहे. २ हजार १५४ जण गंभीर, तर १ हजार ८४१ जण किरकोळ जखमी झाले आहेत. गेल्या वर्षात ७२१ अपघात ठार झाले, तर ४७१ जण ठार झाले आहेत. एकंदरीत अपघातात जीव गमावलेल्या व्यक्तींमध्ये सर्वाधिक संख्या तरुणांचीच असल्याची माहिती सूत्रांनी दिली. संपूर्ण देशात दरवर्षी पाच लाख लोकांचा अपघातात मृत्यू होतो.

आतापर्यंतच्या अपघातात ४० वर्षांच्या आत मृत्यू झालेल्यांची संख्या सर्वाधिक आहे. घरातील तरुण कर्ता पुरुषच या अपघातात ठार झाल्याची आकडेवारी आहे. चिंतेची बाब म्हणजे महामार्गावरच सर्वाधिक अपघात झाले आहेत. खराब रस्ते, साइडपट्ट्या, समांतर रस्त्याचा प्रश्न मार्गी न लागल्याचेही त्याला कारण कारणीभूत आहे. वाढत्या लोकसंख्येप्रमाणे वाहनांचीही संख्या झपाट्याने वाढत चालली आहे. दुचाकी, कार व अन्य प्रकारातील सर्व वाहनांची संख्या ही जिल्ह्यात १० लाखांच्या घरात आहे. सर्वाधिक अपघात हे राष्ट्रीय महामार्गावर व त्यानंतर राज्य मार्गावर झालेले आहेत. यातील काही बळी हे अवजड वाहनांच्या धडकेने झाले आहेत.

दहशतवादी हल्ल्यातील शहिदांपेक्षा

अपघातात ठारची संख्या अधिक

देशात दहशतवादी हल्ल्यात शहीद होणाऱ्या जवानांपेक्षा रस्ता अपघातात ठार होणाऱ्या तरुणांची संख्या अधिक आहे. जळगाव जिल्ह्यातील ही आकडेवारी चिंताजनक आहे. ही बाब लक्षात घेता एका जागेवर तीनपेक्षा जास्त मोठे अपघात झाले असतील, तर ते ठिकाण ‘ब्लॅक स्पॉट’ म्हणून जाहीर करण्यात आले आहेत. या ठिकाणच्या अपघाताची कारणे शोधून तेथे उपाययोजना करण्यात आल्या आहेत. जळगाव शहरातील महामार्गावरील शिव कॉलनी, तरसोद फाटा व मेहुणबारे, असे तीन ब्लॅकस्पॉट जाहीर झाले आहेत.

सहा वर्षांतील अपघात व त्यात मृत्यू झालेल्यांची संख्या

वर्ष अपघात मृत्यू गंभीर जखमी जखमी

२०१६ ३८५ ४२५ ५६१ २१८

२०१७ ८३१ ४२२ ३२८ ६१०

२०१८ ८२५ ३९६ ४४३ ४५४

२०१९ ७८४ ४३५ ४४५ ३६८

२०२० ७२१ ४७१ ३७७ १९१

एकूण ३,५४६ २,१४९ २,१५४ १,८४१

Web Title: 2,149 people killed in road accidents in five years

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.