कोरोनाचे जिल्ह्यात २१६ नवे रुग्ण
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 23, 2021 04:23 AM2021-02-23T04:23:52+5:302021-02-23T04:23:52+5:30
लोकमत न्यूज नेटवर्क जळगाव : रविवारी जिल्ह्यात कोरोनाचा विस्फोट झाला. कोरोना रुगण्संख्येने चार महिन्यातील उच्चांक नोंदविला आहे. जिल्ह्यात कोरोनाचे ...
लोकमत न्यूज नेटवर्क
जळगाव : रविवारी जिल्ह्यात कोरोनाचा विस्फोट झाला. कोरोना रुगण्संख्येने चार महिन्यातील उच्चांक नोंदविला आहे. जिल्ह्यात कोरोनाचे २१६ नवे रुग्ण आढळून आल्याने खळबळ उडाली आहे. कोरोनाचा वाढता आलेख चिंता वाढविणारा असून सक्रिय रुग्णांच्या संख्येने १ हजाराचा टप्पा ओलांडला आहे. जळगाव शहर ७९ व चाळीसगाव ५४ ही दोन ठिकाणे कोरोनाचे हॉटस्पॉट ठरले आहेत.
जळगाव शहरात कोरोनाचे रुग्ण वाढत असताना नागरिकांकडून कोरोनासंबधीच्या नियमांची पायमल्ली होत आहे. यासाठी खुद्द जिल्हाधिकारी अभिजित राऊत ॲक्शन मध्ये आले असून, रविवारी शहरातील ५० पेक्षा अधिक वऱ्हाडी असलेल्या, नियमांची पायमल्ली करणारी सहा मंगल कार्यालय व लॉन्स सील करण्यात आली आहेत. जिल्हा पोलीस प्रशासनाकडून सहाही मंगल कार्यालयांचे मालक व आयोजकांवर गुन्हे देखील दाखल करण्यात आले आहेत. यात जळगाव शहरातील दापोरे मंगल कार्यालय, पिंप्राळा रोड वरील यश लॉन, लाडवंजारी मंगल कार्यालय, कमल पॅराडाईज, क्रेझी होम व मिराई लॉन्स वर कारवाई करण्यात आली.
दरम्यान, कोरोना नियमांचे पालन न करणारे तसेच विना मास्क फिरणार्या नागरिकांवर मनपा व पोलीस प्रशासनाने कारवाई केली. त्यांच्याकडून दंड वसुल करण्यात आला आहे.