२२ शेतकरी व १२ बेरोजगारांना पावणे दोन कोटीचा गंडा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 13, 2021 04:38 AM2021-01-13T04:38:39+5:302021-01-13T04:38:39+5:30

चाळीसगाव, जळगाव, भुसावळ व चोपडा उपविभागात १२ सुशिक्षित बेराेजगार तरुणांना नोकरी व इतर कारणांनी भामट्यांनी ६२ लाख ६ हजार ...

22 crore to 22 farmers and 12 unemployed | २२ शेतकरी व १२ बेरोजगारांना पावणे दोन कोटीचा गंडा

२२ शेतकरी व १२ बेरोजगारांना पावणे दोन कोटीचा गंडा

Next

चाळीसगाव, जळगाव, भुसावळ व चोपडा उपविभागात १२ सुशिक्षित बेराेजगार तरुणांना नोकरी व इतर कारणांनी भामट्यांनी ६२ लाख ६ हजार ६१८ रुपयांना गंडा घातला आहे. यापैकी चाळीसगाव ३ व फैजपूरमधील एक प्रकरण चौकशीवर असून जळगाव, भुसावळ व चोपडा उपविभागात प्रत्येकी २ तर फैजपूर व चाळीसगावमध्ये प्रत्येकी १ गुन्हा दाखल आहे. १५ लाख ५५ हजार रुपये सुशिक्षित बेरोजगारांना परत मिळवून देण्यात पोलिसांना यश आले आहे तर तीन लाखाची रक्कम परत मिळणार असल्याचे सांगण्यात आले.

महानिरीक्षकांचे विशेष लक्ष

शेतकरी व सुशिक्षित बेराेजगार तरुणांच्या फसवणुकीकडे विशेष पोलीस महानिरीक्षक प्रताप दिघावकर यांनी विशेष लक्ष केंद्रित केलेले आहे. त्यामुळे शेतकरी व बेरोजगारांच्या फसवणुकीचे गुन्हे दाखल करण्यासह फसवणूक झालेली रक्कम परत मिळायला सुरुवात झालेली आहे. याबाबत दिघावकर यांनी पत्रकार परिषद घेऊन शेतकरी व बेरोजगार तरुणांना आवाहन केले होते.

अशी आहेत फसवणुकीची प्रकरणे

वर्ग संख्या फसवणुकीची रक्कम परत मिळालेली रक्कम

शेतकरी २२ १,१६ ,१२,२८९ ८,०४,०००

सुशिक्षित बेराेजगार १२ ६२,०६,६१८ १५,५५,०००

Web Title: 22 crore to 22 farmers and 12 unemployed

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.