भुसावळ नगराध्यक्षांना २२ लाखांचा दंड

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 1, 2018 12:13 AM2018-11-01T00:13:00+5:302018-11-01T00:13:45+5:30

भुसावळ येथील नगराध्यक्ष रमण भोळे यांनी शेती एन ए न करताच सातारे शिवारातील शेतामध्ये मारुती स्टोन कंपनी टाकून उद्योग सुरू केल्यामुळे प्रांताधिकारी श्रीकुमार चिंचकर यांनी २१ लाख ८४ हजार ३८० रुपये दंड ठोठावला आहे.

22 lakh penalty for municipal corporation of Bhusawal | भुसावळ नगराध्यक्षांना २२ लाखांचा दंड

भुसावळ नगराध्यक्षांना २२ लाखांचा दंड

Next
ठळक मुद्देशेती येणे न करताच केली स्टोन क्रेशर कंपनी सुरूकारवाईने शहरासह तालुक्यात खळबळ

भुसावळ, जि.जळगाव : येथील नगराध्यक्ष रमण भोळे यांनी शेती एन ए न करताच सातारे शिवारातील शेतामध्ये मारुती स्टोन कंपनी टाकून उद्योग सुरू केल्यामुळे प्रांताधिकारी श्रीकुमार चिंचकर यांनी २१ लाख ८४ हजार ३८० रुपये दंड ठोठावला आहे. ही कारवाई करून प्रांताधिकारी चिंचकर यांनी नगराध्यक्ष भोळे यांना चांगलाच दणका दिल्यामुळे शहरासह तालुक्यात एकच खळबळ उडाली आहे.
नगराध्यक्ष भोळे यांची सातारे शिवारात शेत जमीन आहे. या शेतात त्यांनी स्टोन क्रेशर कंपनी टाकण्याच्या परवानग्या घेतल्या आहे. मात्र महसूल विभागाकडून शेत येणे न करताच कंपनी सुरू केली आहे. त्यामुळे यासंदर्भात किशोर उखा पाटील यांनी तहसील कार्यालयात यासंदर्भात तक्रार केली होती व महाराजास्व अभियान अंतर्गत दंड करण्याची मागणी केली होती. या अनुषंगाने प्रशासनाने चौकशी करून प्रांताधिकारी चिंचकर यांनी दंडाचा निर्णय घेतला आहे. मात्र शेत जमीन येणे न करताच सोन क्रेशर मशीनची परवानगी मिळाली कशी, असा प्रश्नही उपस्थित झाला आहे.
दरम्यान ,नगराध्यक्ष भोळे यांच्याशी संपर्क केला असता त्यांनी भ्रमणध्वनीवरून प्रतिसाद दिला नाही. त्यामुळे त्यांची प्रतिक्रिया मिळू शकली नाही.


 

Web Title: 22 lakh penalty for municipal corporation of Bhusawal

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.