२२० गुणवंतांचा गौरवs
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 2, 2019 12:38 PM2019-09-02T12:38:58+5:302019-09-02T12:40:02+5:30
जळगाव : जिल्हा दोडे गुर्जर संस्थानच्यावतीने रविवारी गुणवंत गौरव समारंभाचे आयोजन करण्यात आले होते. त्यात समाजातील २२० गुणवंतांचा गौरव ...
जळगाव : जिल्हा दोडे गुर्जर संस्थानच्यावतीने रविवारी गुणवंत गौरव समारंभाचे आयोजन करण्यात आले होते. त्यात समाजातील २२० गुणवंतांचा गौरव करण्यात आला.
जळगाव दोडे गुर्जर संस्थांनची इमारत उभी राहण्यासाठी राजकीय मतभेद विसरून सर्वांनी पुढाकार घ्यावा, असे प्रतिपादन सहकार राज्य मंत्री गुलाबराव पाटील यांनी केले.
अध्यक्षस्थानी अंबरनाथचे माजी नगराध्यक्ष सुनील चौधरी होते. जि. प. चे माजी अध्यक्ष गोरख पाटील, इंदिराताई पाटील, समाज जिल्हाध्यक्ष चंद्रशेखर पाटील, उपाध्यक्ष अशोक जाधव, सचिव डॉ. राधेश्याम चौधरी, आरोग्य सभापती दिलीप पाटील, डॉ. चंद्रशेखर पाटील, लकी टेलर, जि.प. सदस्य गोपाळ चौधरी, यशवंत पटेल (निझर), पी. सी. पाटील, वसंत चौधरी (धुळे), नंदकिशोर पाटील, शिवाजीराव पाटील, पन्नालाल पाटील, शिवाजी पाटील, (मुंबई), संजय पाटील (खारिया), देविदास पाटील (सुरत), कांतीलाल पाटील (औरंगाबाद) उपस्थित होते. यावेळी नायब तहसीलदार प्रतिभा चौधरी, विजय पाटील, जनार्दन पवार, अॅड. प्रकाश पाटील, राजेंद्र पाटील, कवी रमेश जे.पाटील, ज्ञानेश्वर पाटील, निंबादास पाटील, शकुंलता पाटील, डॉ.सारिका पाटील, डॉ. दीपक पाटील, योगेश पाटील, मोहित पाटील, डॉ. गौरव सूर्यवंशी, संजय पाटील(खारिया), पुरुषोत्तम महाराज, सुशील महाराज, दीपमाला चौधरी, कमलाकर पाटील, पाणी फाऊंडेशन टीम निम ता.अमळनेर, डॉ प्रशांत पवार, पत्रकार विकास पाटील, साहित्यिक गिरीश पाटील, भरत चौधरी, गुणवंतांमध्ये गौरव संजय पाटील, वेदांत पाटील, लोकेश पाटील, निखिल पाटील, राहुल पाटील, मयूर पाटील, आशिष पाटील, गौरव वासुदेव पाटील, रोहित पाटील, सचिन पाटील, खुशी जाधव, काजल चव्हाण, महेंद्र पाटील, भूषण पाटील, शुभम पाटील याचा सत्कार करण्यात आला.