शहरात आढळले कोरोनाचे २२२ नवे रुग्ण
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 22, 2020 12:53 PM2020-08-22T12:53:59+5:302020-08-22T12:54:09+5:30
जळगाव : शहरात शुक्रवारी कोरोनाचा विस्फोट झाल्याचे चित्र समोर आले़ एकाच दिवसात तब्बल २२२ बाधित रुग्णांची नोंद करण्यात आली ...
जळगाव : शहरात शुक्रवारी कोरोनाचा विस्फोट झाल्याचे चित्र समोर आले़ एकाच दिवसात तब्बल २२२ बाधित रुग्णांची नोंद करण्यात आली आहेत. यासह चार बाधितांच्या मृत्यूची नोंद करण्यात आली आहे़ ग्रामीणमध्येही अॅन्टीजनच्या माध्यमातून ६६ व एकत्रित ७४ रुग्ण आढळून आले आहे़ तालुक्याची रुग्णसंख्या ६०७० झाली आहे़
शहरातील मृतांची संख्या वाढून १४१ वर पोहोचली आहे़ तर शुक्रवारी १०४ कोरोना बाधित रुग्णांना बरे झाल्यानंतर घरी सोडण्यात आले़ बरे झालेल्यांची संख्या ३६७२ झाली असून ११०९ रुग्णांवर उपचार सुरू आहेत़ जिल्हाभरात शुक्रवारी १३ बाधितांच्या मृत्यूची नोंद करण्यात आली आहे़ यात जळगाव शहरातील ६६ व ५५ वर्षीय प्रौढ, तसेच ५५ व ६४ वर्षीय महिलेचा समावेश आहे़ यासह अमळनेर, पाचोरा तालुक्यात प्रत्येकी २, चोपडा, धरणगाव, चाळीसगाव, जामनेर, भडगाव या ठिकाणी प्रत्येकी १ बाधिताचा मृत्यू झाला आहे़
या भागात आढळले रुग्ण
पिंप्राळा ३, विठ्ठलपेठ २, निवृत्तीनगर २, गुलमोहर कॉलनी ३, मुंदडा नगर ३, ढाकेवाडी, कांचन नगर, ओमशांती नगर, दादावाडी, रिंगरोड, मेहरूण तलाव, शिरामनगर, मयुर कॉलनी, नवीपेठ, पोलीस लाईन, पीडब्ल्यूडी क्वार्टर, महाबळ, दांडेकरनगर, खोटेनगर, गुजराल पेट्रोलपंप, प्रतापनगर, वाघनगर, हनुमाननगर, चौघुले प्लॉट, नवीपेठ, हरिविठ्ठलनगर, विठ्ठलपेठ, माऊलीनगऱ