इंग्रजीच्या पेपरला कॉपी २३ विद्यार्थ्यावर कारवाई

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 6, 2019 12:04 PM2019-03-06T12:04:39+5:302019-03-06T12:05:50+5:30

बंदोबस्त असूनही कॉपीचे प्रकार घडत असल्याने आश्चय

23 students take action against copy of English paper | इंग्रजीच्या पेपरला कॉपी २३ विद्यार्थ्यावर कारवाई

इंग्रजीच्या पेपरला कॉपी २३ विद्यार्थ्यावर कारवाई

Next


जळगाव : दहावीच्या इंग्रजीच्या पेपरला भुसावळ आणि ऐनपूर, चिनावल येथे भरारी पथकाने २३ विद्यार्थ्यांवर कारवाई केली.
भुसावळ येथील बी़झेड़ उर्दु हायस्कूल येथे दुपारी विद्यार्थ्यांची झाडाझडती घेतली़ यात एका वर्गातील विद्यार्थ्यांच्या प्रश्नपत्रिकांवरच उत्तरे लिहीलेली आढळून आली़ तर याच हायस्कूलमधील एका वर्गात स्वत: पर्यवेक्षिकाने परीक्षार्थी विद्यार्थ्यांच्या पेपरात उत्तरे लिहील्याचा प्रकार समोर आला़ या पर्यवेक्षिकासह दोन विद्यार्थ्यांवर पथकाकडून कारवाई करण्यात आल्याची माहिती मिळाली.
जेष्ठ अधिव्याख्याता मंजुषा क्षीरसागर यांच्या पथकाने ऐनपुर येथील सरदार वल्लभभाई पटेल हायस्कूलमधील १६ तर चिनावल येथील नुतन माध्यमिक विद्यालयातील ३ कॉपी बहाद्दरांवर कारवाई केली़ तसेच माध्यमिक शिक्षणाधिकारी देविदास महाजन यांच्या पथकाने जळगाव शहरातील खुबचंद सागरमल विद्यालयात २ कॉपी बहाद्दरांवर कारवाई केली़
जिल्ह्यात इंग्रजीच्या पेपराला एकूण २३ विद्यार्थ्यांवर केली़
काही ठिकाणी बंदोबस्त असूनही कॉपीचे प्रकार घडत असल्याने आश्चय व्यक्त होत आहे.

Web Title: 23 students take action against copy of English paper

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.