उघड्या घरातून २३ हजारांचा ऐवज लांबविला
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 20, 2021 04:45 AM2021-02-20T04:45:53+5:302021-02-20T04:45:53+5:30
महिलेच्या हातातून मोबाइल लांबविला जळगाव : कामावरून घरी चालत जात असताना मागून दुचाकीवरून आलेल्या दोघांनी राखी मिश्रीलाल मुजालदे (२३) ...
महिलेच्या हातातून मोबाइल लांबविला
जळगाव : कामावरून घरी चालत जात असताना मागून दुचाकीवरून आलेल्या दोघांनी राखी मिश्रीलाल मुजालदे (२३) यांच्या हातातून मोबाइल हिसकावून पळ काढल्याची घटना १७ रोजी रात्री ८ वाजता आर.आर. शाळेनजीकच्या गुरुद्वाराजवळ घडली. या प्रकरणी शुक्रवारी जिल्हा पेठ पोलीस ठाण्यात जबरी चोरीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. राखी मुजालदे या खासगी रुग्णालयात नोकरीला आहेत. तपास सहायक पोलीस निरीक्षक महेंद्र वाघमारे करीत आहेत.
जिल्हाधिकारी कार्यालयाच्या प्रवेशद्वाराजवळूनच मोबाइल लांबविला
जळगाव : ग्राहक मंचात नोकरीला असलेल्या भटू पंढरीनाथ वाणी (५१) यांच्या हातातील १७ हजार रुपये किमतीचा मोबाइल दुचाकीवरून आलेल्या दोघांनी लांबविल्याची घटना १७ रोजी रात्री ८.१५ वाजता जिल्हाधिकारी कार्यालयाच्या पहिल्या प्रवेशद्वाराजवळच घडली. या प्रकरणी जिल्हा पेठ पोलीस ठाण्यात जबरी चोरीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. तपास सहायक पोलीस निरीक्षक किशोर पवार करीत आहेत.
दळणावरून शिवीगाळ केल्याने मारहाण
जळगाव : दळण दळण्याच्या कारणावरून आईला शिवीगाळ का करतो, असे म्हणत प्रभू भरत कोळी (रा. खापरखेडा, ता. जळगाव) याने व इतर तिघांनी अरुण देवराम पाटील (रा. नांद्रा, ता. जळगाव) यांना लाकडी दांडक्याने मारहाण केल्याची घटना १८ रोजी रात्री ८ वाजता ममुराबाद रस्त्यावर घडली. या प्रकरणी शुक्रवारी तालुका पोलीस ठाण्यात तिघांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
सोशल मीडियावर बनावट खाते
जळगाव : मेहरुण तलाव परिसरात श्री श्री लेक प्राइड या अपार्टमेंटमध्ये राहणाऱ्या रुचा बाळकृष्ण महानोर (२१) या तरुणीच्या नावाने कोणीतरी सोशल मीडियावर बनावट खाते तयार केल्याचा प्रकार उघडकीस आला आहे. १२ ते १८ फेब्रुवारी या कालावधीत हा प्रकार घडला आहे. या प्रकरणी सायबर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.